भोकरदन येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

by - 22:22

भोकरदन येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

भोकरदन दस्तक प्रतिनिधि 
भोकरदन 
बुधवारी रोजी दुपारी 12: 00 वाजता पंचायत समितीच्या शेतकी बचत भवन या सभागृहामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभा घेण्यात आली. या अभिवादन सभेचे दिपप्रज्वलन करून मा.नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी उदघाटन केले तर जेष्ट पत्रकार नारायणराव पैठणकर यांनी गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सदर अभिवादन सभा ही अ.भा. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष अॅड. एफ.एच. सिरसाठ यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती. याप्रसंगी अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना अॅड. सिरसाठ यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या विचार व कार्याचा परिचय उपस्थितांना करून दिला. राष्ट्रसंत गाडगेबाबा हे एक चालतं बोलतं माणुसकीच विदयापीठ होतं व त्यांनी आपल्या आचरणातून खरा माणूस निर्माण केला व मानव धर्माचा आविष्कार व अंगीकार केला. त्यांनी आयुष्यभर समाजाची सेवा केली व समाजहित हेच राष्ट्रहित असल्याचे प्रतिपादन करुन राष्ट्रधर्म जागविला . त्यानी आयुष्यभर केलेल्या कामाचा कधीही मोबदला मागितला नाही म्हणून त्यांना निष्काम कर्मयोगी असे म्हटले जाते. राष्ट्संत गाडगेबाबांनी जीवनाकडे वास्तविक विज्ञानवादी चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिल्याने त्यांना खरे सत्यशोधक म्हटले जाते. संत गाडगेबाबांनी समाजातीत अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, पंरपरा व कर्मकांडांचे थोतांड व पाखंडीपणा बंद करून समाजात जातीभेद नष्ट करुन समानतेचा नुसता आग्रहच धरला नाही तर प्रत्यक्षात तसे आचरण करुन समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला. त्यामुळे राष्ट्रसंत गाडगेबाबा हे त्या काळातील कृतीशील सुधारक संत होते. उपाशी रहा परंतु आपल्या मुलाबाळांना शिक्षण दया असा उपदेश ते आपल्या किर्तनातून लोकांना देत. त्यांचे हुंडाबंदी, व्यसनमुकती, शिक्षणासंबंधोचे विचार समाजाला आजही प्रेरणादायी असून आजच्या युगात देखील अशा परोपकारी संताची गरज असल्याचे प्रतिपादन अॅड. एफ.एच. सिरसाठ यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात केले. याप्रसंगी मा.नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात गाडगेबाबाच्या विचाराप्रमाणे वागणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल असे ठासून प्रतिपादन केले. याप्रसंगी त्र्यंबकराव पाबळे, श्रावणकुमार आकसे, नारायणराव पैठणकर, प्रमोद खरात यांची देखील समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाला सौ. वरपे, सौ. निर्मलाबाई पैठणकर, सौ संगीता पैठणकर, सौ. उषा सिरसाठ, सौ. मंगल आकोदे, सौ. बैनाडे, सौ कमलबाई क्षीरसागर, अलकाबाई बनकर या महिलासह काकासाहेबसाबळे, दिपक बोरडे , बाळू क्षीरसागर, जगदिश पैठणकर, गणेश पैठणकर, रमेश पैठणकर, धोंडिरामपैठणकर, एकनाथ भराड, अभिजीत भारती, रामेश्वर पा. सोनवणे, राजू खरात,रामधन इंगळे, प्रकाश सुरडकर, कदिर बापू, समाधान गवळी, रमेश गवळी, अरूण गवळी, मिलींद गवळी, महादू सुरडकर, विश्वनाथराव वरपे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी साहेबराव शिंदे प्रणित स्वरमधूर शाहीरी कला संचाचा समाजप्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन बी.एल. बडगे यांनी तर आभार प्रदर्शन विश्वनाथराव वरपे यांनी केले .


 जाहिरात _classified_जाहिरात _classified_जाहिरात _classified_जाहिरात _classified

You May Also Like

0 Comments