भोकरदन शहरातील पाणी पुरवठा करणारे वॉल्व दोन दिवसात दुरुस्त करा : महेबूब भारती
भोकरदन शहरातील पाणी पुरवठा करणारे वॉल्व दोन दिवसात दुरुस्त करा : महेबूब भारती
भोकरदन दस्तक प्रतिनिधि
-
नगर परिषदचे मुख्याधिकारी श्री अमित सांडगे यानी नूर सोशल ग्रुपचे अध्यक्ष महबूब भारती यांना सांगितले की दोन दिवसात शहरातील न दुरुस्त वॉल्व लॉकर दुरुस्त करण्यात येईल
भोकरदन शहरातील काझी मोहल्ला, मुल्ला गल्ली, पोस्ट ऑफिस परिसर, दानापूर वेस, कुरेशी गल्ली आदी भागात जे पाणी पुरवठा करणारी वॉल्व पूर्णत: दूरअवस्था खराब झालेले असून त्या वॉल्व मधून लाखो लिटर पाणीची दररोज गळती होत असून येणा-या उन्हाळ्यात पाणीची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकतो तसेच पाणीची गळती मुळे शहरातील रस्ते पूर्णतः खराब होत आहे. याविषयी संबंधित वार्डाचे नगर सेवक व नगर परिषदेला वारंवार तोंडी तक्रार केल्यावर ही नगर सेवक व नगर परिषद काही उपाय योजना करीत नाही नगर सेवक व नगर परिषदेला नागरिकाचे जीवाशी व आरोग्याशी काही देणे घेणे नाही असे दिसते, विशेष म्हणजे शहरातील काही भागात फुटलेल्या वॉल्व जवळ धार्मिक स्थळे आहे येथे येणारे भाविकांना फार त्रास सहन करावा लागत आहे, पाण्याची गळती दोन दिवसात थांबवावी व संबंधित पाणी पुरवठा निरीक्षकावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा नूर सोशल ग्रुप तर्फे नगर परिषदेच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशी मागणीच्या निवेदन नूर सोशल ग्रूप तर्फे देण्यात आला.निवेदनावर ग्रूप चे अध्यक्ष महेबूब भारती,झकेर पठाण ,शिवसेना लीडर विट्ठल पवारशेख अमीन,शेख वासिम,शेख शाहीद,नाझेम खान,एम.ऐ.अझीझ ,अनिस भारती,,शैख्न अन्सार,शेख अलीम,रशीद कुरेशी ,विनोद गायकवाड,शेख सलमान,शेख गुड्डू,यांची सह्या आहे.
नगर पपरिषद च्या हलगरजी पण मुळे दररोज न दुरुस्त वॉल्व मधून लाखो लिटर पाणीची गळती होत आहे ज्यामुळे येणा-या उन्हाळ्यात पाणीची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकतो.व संबंधित पाणी पुरवठा निरीक्षकावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी जर नगर परिषदने होणाऱ्या संमास्या कडे दोन दिवसात लक्ष घालून वॉल्व दुरुस्त न केल्यास आम्ही ग्रूपच्या माध्यमातून नगर परिषदच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल.
महेबूब भारती (अध्यक्ष नूर सोशल ग्रूप भोकरदन )
0 Comments