प्रभाग क्रमांक ०२ मध्ये नगर परिषद भोकरदन च्या वतीने स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला.
भोकरदन दस्तक प्रतिनिधि ___
भोकरदन शहर हागणदारी मुक्त झाल्या नंतर आता भोकरदन नगर पालिकेने स्वच्छ शहर सुंदर शहर करण्याच्या संकल्पनेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे गुरुवारी सकाळी प्रभाग क्रमांक ०२ व ०३ मध्ये स्वच्छता विषयी जनजागृती रेलीची सुरुवात दानापुर वेस, हाजी शेख चांद चौक, सादात चौक, मुल्ला गल्ली, बालाजी मंदिर परिसर, कुरेशी गल्ली, पेशवे नगर, लालगढी, शास्त्री नगर, प्रशाद गल्ली, सुतार गल्ली, काझी मोहल्ला, मर्कज नगर, न्यू हाय स्कूल परिसर, सराफा मार्केट, पोलीस स्टेशन परिसर, जुनी तहसील परिसर आदी परिसरात स्वच्छता करण्यात आली. या वेळी परिसरातील घाण, प्लास्टिक, केरी बग व कचरा वेचण्यासाठी उपस्थित स्वच्छता सभापती वंदना तळेकर, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे, उपाध्यक्ष इरफानोद्दिन सिद्दिकी, माजी नगर अध्यक्ष राजा भाउ देशमुख नगर सेवक कदीर बापू, शेख रिजवान भाई, नूर सोशल ग्रुपचे अध्यक्ष महेबूब भारती, जाकेर पठाण, संतोष अन्नदाते, रमेश इंगळे, आनंद नगरीचे पत्रकार रितेश देशपांडे पत्रकार अनिस भारती व नगर परिषदेचे कर्मचारी यांची उपस्थिती होती. या वेळी प्रभाग क्रमांक ०२ व ०३ येथील नागरिकांनी श्रमदान
करून परिसर स्वच्छ केले, यावेळी स्वच्छता निरीक्षक वामन आडे, नगर अभियंता डी.आर जाधव, आर.बी जाधव, एस.एन जाधव, संतोष बन्सी राठोड, पी.एस.नेवासकर, एम.एम शेख, एस.एस.बेग, एस.के बिरारे, के.एस जाधव, साहेब खान यांच्या सह सफाई कामगारांनी श्रमदान केले. दरम्यान नगर पालिकेच्या वतीने घरोघरी दारावर ओला कचरा व सुका कचरा वर्गणीकरण करण्याचे पोस्टर, बनर, स्टीकर आदी लावण्यात आले
0 Comments