भोकरदन शहरात कडकडीत बंद पाळला : काही युवकांना अटक व सुटका
भोकरदन शहरात कडकडीत बंद पाळला : काही युवकांना अटक व सुटका
भोकरदन दस्तक (अनीस भारती )भोकरदन : कोरेगाव भीमा येथील शहरात कडकडीत बंद पाळला जात असताना आंबेडकरी अनुयायी रस्त्यारस्त्यांवर मोर्चे काढून निषेध व्यक्त करीत आहेत. संतत्प अनुयायांनी दुपारी आंबेडकर चौक,शिवाजी चौक,घोषणा बाजी करून आपल्या रोषाला वाट मोकळी करून दिली. आंदोलनात महिलांचाही सहभाग असून, यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच आंबेडकरी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणाऱ्या कही युवकांना अटक करण्यात आली शहरात आंबेडकरी आंदोलक दुकाने बंद करण्यासाठी आंबेडकर चौकाकडून जूना भोकरदन रोडकडे जात असताना, काही आंदोलकांनी परिसरातील सुरू असलेल्या दुकाने बंद करण्यास सांगितले. कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी केलेल्या बंद आंदोलनामध्ये अम्बेडकरी जनता व महिलायांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बुधवारी एसटी, सर्व शाळा बंद
कोरेगाव भीमा येथील घटनेचे राज्यासह भोकरदन तीव्र पडसाद उमटले. आंबेडकरी चळवळीतील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी बुधवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. या पृष्ठभूमीवर बुधवारी रात्री १२ पर्यंत एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक तसेच भोकरदनशहरातील सर्व शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी बुधवारी प्रवास टाळावा तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दुकाने बंद पाडली!
शहरातील मुख्य बाजारपेठ टीपू सुल्तान चौक, ममता नगर, जुने शहर, मैंन रोड, जफराबाद रोड ,इंडिया काम्प्लेक्स ,सिल्लोड कॉर्नर,सिल्लोड रोड,शिवाजी मार्किट (दर्ज़ी बाजार ),मच्छी मार्किट ,नगर परिषद परिसर ,पोलिस्टेशन परिसर,मार्क्स मस्जिद परिसर ,सराफा बाजार,नई भाजी मंडी ,जोतिबा चौक,मोंढा परिसरातील दुकाने बंद करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी आवाहन केले.
0 Comments