भोकरदन जवळ भीषण अपघात | अपघातात आई आणि मुलगा दोघे जागीच ठार

by - 19:23

भोकरदन जवळ भीषण अपघात | अपघातात आई आणि मुलगा दोघे जागीच ठार

विरेगाव:-आदिल शाह
भोकरदनहून कडे निघालेल्या दुचाकीला काळीपीळी ट्रेक्स धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोनजण आई आणि मुलगा ठार झाले आहेत.  दुपारी 3 वजे च्या दरम्यान झालेल्या या अपघातात अन्य पांच जण गंभीर जखमी आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलाबाई साहेबराव पवार(आई  वय 45 वर्षे ) आणि मुलगा रविंद्र साहेबराव पवार( वय 22वर्षे ) दोघे राहणारे वालसा वडाला येथील रहिवाशी आहे, जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.शहराजवळील जफराबाद रोडवर असलेल्या विरेगाव विरुद्ध दिशेने भोकरदनकडून जफराबाद  जाणाऱ्या काळीपीळी ट्रेक्स( एम  एच  20 बी टी  7031) त्यांना समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात कमलाबाई साहेबराव पवार(आई  वय 45 वर्षे )आणि मुलगा रविंद्र साहेबराव पवार( वय 22वर्षे ) यांचा जागीच मृत्यू झाला.  आणि बाबरखान शकिल खान(रा.औरंगाबाद20),ताहेर मन्नु बागवान-(रा.औरंगाबाद 35)रफीक बेग हैदर बेग(32 रा.सिल्लोड)सादिया शेख रफीक- (45 रा. सिल्लोड )नय्युमखान निजामखान पठान-(40 रा. सिल्लोड)या जखमींना उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात दाखल कऱण्यात आले त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.



You May Also Like

0 Comments