भोकरदन : उस्मानपेठ येथे घाणी चे साम्राज्य,नगरपरिषद चा काना डोळा

by - 16:16

भोकरदन : उस्मानपेठ येथे घाणी चे साम्राज्य,नगरपरिषद चा काना डोळा



भोकरदन येथील प्रभाग1 उस्मानपेठ येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यात नगरपरिषद बघ्याची भूमिका घेत आहे,ज्यामुळे नागरिकांत कोरोना सोबत दुसरे आजार पसरण्याची भीती निर्माण झालीआहे।परंतु येथील लोकप्रतिनिधी व नगर परिषद या कडे लक्ष देत नाही आतापर्यंत नगर परिषदने स्वच्छता वर करोडो रुपये खर्च करून परिस्थिती जैसे थे निर्माण झाली आहे. या प्राभागत डासांचा प्रभाव ही वाढला असून सर्वत्र डासच दिसत आहे व सध्या पावसाळा सुरू असल्याने घाण कचरा रस्त्यावरच पडलेली आहे ज्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्घन्ध पसरले आहे,प्रभागातील नाल्या देखील महिनो महिने साफ सफाई करत नसल्याने नाल्याचे घाण पाणी रस्त्या वर येत आहे त्यामुळे लोकांना येजा करणे कसरतीचे झाले आहे या बाबत नगर परिषद  चे स्वच्छता निरीक्षक, वामन आडे याचा कडे लेखी व तोंडी तक्रार देखील येथील नागरिकांनी केली परंतु काही उपयोजना नगर परिषद द्वारा  करण्यात आलेले नाही,ज्यामुळे येथील नागरिकांत नगर परिषद  बद्दल रोष निर्माण झालेले आहे,तसेच नगर परिषदने सदरील परभागचा घाण कचरा त्वरित उचलण्याची मांग येथील नागरिक करीत आहे,




प्रभागात 1 नगरपरिषद या परिसरात कोणताही लक्ष देत नाही येथील लोकांच्या घरा समोर कचरा टाकत आहे तसेच नाल्या तुडूंब भरल्यानंतर ही नप साफ सफाई करीत नाही ज्यामुळे येथी नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे,नप ने तात्काळ पुर्ण प्रभाग 1 स्वच्छता करावी अन्यथा परिसरातील जनतेला घेऊन आंदोलन करणार,( नजिर मो इल्यास मा,नगराध्यक्ष भोकरदन )

You May Also Like

0 Comments