प्रेषित येशु ख्रिस्तांविषयीचे गैरसमज व अज्ञानाचा अंधार दूर करा |25 Dec - Christmas

by - 09:47

प्रेषित येशु ख्रिस्तांविषयीचे गैरसमज व अज्ञानाचा अंधार दूर करा

अनेकांना ही गोष्ट माहितच नाही की

आदरणीय प्रेषित येशू खिस्त (त्यांना शांती लाभो) हे इस्लाम धर्माचे प्रेषित असून




प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यासोबतच प्रेषित येशू खिस्त आणि त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या जवळपास एक लाख चोवीस हजार प्रेषितांना अल्लाहचे प्रेषित मान्य करणे हे एक मुस्लिम होण्यासाठी अनिवार्य आहे


कुणी जर प्रेषित मुहम्मद सल्लम यांना प्रेषित मानत असेल पण येशू खिस्तांना अल्लाहचे प्रेषित मानत नसेल तर तो मुस्लिम गणलाच जात नाही.


हा अनेक मुस्लिमेतरांचा गैरसमज आहे की, प्रेषित मुहम्मद सल्लम हे इस्लामचे संस्थापक आहेत, पण वास्तविकपणे ते इस्लामचे शेवटचे प्रेषित आहेत.

*त्यांच्यापूर्वी त्यांना धरून जवळपास एक लाख चोवीस हजार प्रेषित जगाच्य कानाकोपर्यात प्रत्येक देशात प्रत्येक युगात होऊन गेलेले आहेत. याच शृंखलेत प्रथम प्रेषित ह़जरत आदम (हे पहिले मानवदेखील आहेत, प्रेषित इब्राहिम, प्रेषित इस्माईल, प्रेषित, प्रेषित मुसा, प्रेषित ईसा (येशू खिस्त) देखील आहेत.* 


*प्रेषित येशु खिस्तांच्या माघारी काही लोकांनी त्यांच्या नावाने ‘खिस्ती धर्म’ स्थापन करून टाकला.* 


*वास्तविक पाहता प्रेषित ईसा हे मुसलमानच आहेत.*


*कुरआनात त्यांचा २४ पेक्षा जास्त वेळा उल्लेख आलेला आहे.*


*त्यांची माता मरयम (मेरी) यांच्या नावाने ‘सुरह मरयम’ म्हणून एक पूर्ण अध्यायच ़कुरआनात अवतरीत झालेला आहे.*


*प्रेषित येशू खिस्त हे माणुस असून ते देव नाहीत, तसेच ते ईशपूत्रदेखील नाहीत, तर अल्लाहचे प्रेषित असल्याची अशी इस्लामची भुमिका आहे.*


*अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा या टोलफ्री नंबरवर -*


*1800 572 3000*


25 Dec - Christmas

You May Also Like

0 Comments