केळना नदी पात्रातून वाळू चोरी जोरात सुरु :भाग १
केळना नदी पात्रातून वाळू चोरी जोरात सुरु :भाग १
भोकरदन (अनिस भारती) दि। 26 /12
भोकरदन शहरातील मध्य भागी असलेली केळना नदी परिसरात जोरात वाळू उपसा सुरु आहे जिल्हा परिषद कन्या शाळा जवळील नदी पात्रातून अवैधरित्या खुलेआम वाळूची चोरटी वाहतूक बिंधास पणे खुलेआम सुरु असल्याचे चित्र आहे महत्वाचे म्हणजे अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतुका मुळे याचा शासनाला लाखोचा चुना बसत आहे विशेष म्हणजे अवैध रित्या खुलेआम वाळूची उत्पन्न करणा-या जवळ कसलाही रॉयल्टी पावती नसून खुलेआम अवैध रित्या वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याचे चित्र आहे. या पूर्वी महसूल विभागाचे अधिकारी यांना अनेक वेळा चकमा दिला गेला असल्याचे बोलले जात आहे तसेच २-३ लोक विशेष महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचा-यावर नजर ठेवून वाळूची चोरटी वाहतूक करून शासनाला चुना लावून आपली तिजोरी भारत आहे तर अशा अवैध रित्या वाळूची चोरटी वाहतूक करणा-यावर कठोर कारवाही करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे तरी महसूल विभागाने अशा लोकांवर सापळा रचून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर भारत आहे विशेष म्हणजे महसूल विभागाचे कर्मचारी, अधिकारी कार्यालयातून निघण्या आधीच यांना खबरी मार्फत माहिती मिळून जात असल्यामुळे कोणीही जाळ्यात सापडत नाही एकीकडे कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार योगिता कोल्हे यांनी पूर्वी दोन ते तीन कोटीची वाळू पकडली होती व वाळू माफियांना मुसक्या आवळल्या होत्या अशा अनेक वाहने व जे.सी.बी यंत्रणा जप्त केले होते आणि दंड वसूल करून सोडले असल्याचे सूत्रांनी सांगितले विशेष म्हणजे पुन्हा एकदा अवैधरित्या खुलेआम वाळू चोरी केली जात आहे तर यातील काहीचे म्हणणे आहे की यांना महसूल विभागाचे सपोर्ट आहे नाव न प्रकाशित करण्याची अटीवर सांगण्यात आले एकीकडे कर्तव्यदक्ष तहसीलदार योगिता कोल्हे जीव ओतुन काम करीत आहे आणि जवळचे असलेलेल लोक जर असा करीत असाल तर फार चिंतेची बाब आहे तरी अशा लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी नागरीकातून होत आहे.
0 Comments