भोकरदन पोलीसा कडुन नियमांचे उल्लंघन इतरावर कठोर कारवाई,

by - 15:28

भोकरदन पोलीसा कडुन नियमांचे उल्लंघन इतरावर कठोर कारवाई,

मुख्य रोडवर वाहने केली उभी
(भोकरदन प्रतिनिधी)
शहरात गेल्या दोन तीन दिवसा पासुन नियमाचे उल्लघंन करणाऱ्या अनेक दुचाकी वाहनावर पोलीसांनी कारवाई करून दंड वसूल केला मात्र पोलिसांनीच नियमाचे उल्लंघन केले असल्यामुळे यांना कोण दंड देणार शहरात अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे कारण तीन दिवसा पासुन सुरू असलेल्या कारवाई मुळे नागरीक नियमाचे पालन करीत असले तरी मात्र पोलीस प्रशासन नियमाचा उल्लंघन करून ईतरावर कारवाई करीत असल्यामुळे नवल वाटत आहे या विषय सविस्तर वृत्त असे की शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ आज पुन्हा दुचाकी वाहनावर पोलीस कारवाई करीत आहे मात्र आपलेच दुचाकी वाहने मुख्य रस्त्यावर लावुन ईतरावर नियमाचे उल्लंघन करीत असल्याने कारवाई करीत आहे पण स्वता नियमाचे उल्लंघन करीत असल्याने यांच्या वर कोण कारवाई करणार असा प्रश्न देखील निर्माण होत आहे विषेश म्हणजे एकीकडे पोलीसांचे कौतुक होत आहे तर दुसरीकडे स्वता नियमाचे उल्लंघन करून कायदा मोडत असल्याने नवल वाटत आहे दरम्यान आम नागरीकांना कायदा आणी पोलीसाना सुट तर अशा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पोलीसावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे हे विषेश

You May Also Like

0 Comments