महाराष्ट्र ही संताची, महापुरुषांची पुण्यभूमी.

by - 22:14

महाराष्ट्र ही संताची, महापुरुषांची पुण्यभूमी

लेखक :एफ.एच . शिरसाठ 
महाराष्ट्र ही संताची, महापुरुषांची पुण्यभूमी. याच भुमीमध्ये संतानी समतेची, मानवतेची व बंधुत्वाची देवून बीजे रोवली तर फुले, शाहू, आंबेडकर आदि पुरोगामी विचारांच्या महापुरुषांनी समतेसाठी व् मानवी मुल्यांच्या स्थापनेसाठी वैचारीक लढा देवून महाराष्ट्रात मोठी वैचारीक क्रांती घडवून समाज परिवर्तनाचा प्रयोग केला परंतु आज समाज हा प्रगतीकडे न जाता त्याची वाटचाल ही अधोगतीकडे होत आहे त्यास कारण असे की देशात व महाराष्ट्रात प्रतिगामी शक्ती प्रबळ होत चालली आहे.एकमेकांच्या जीवाला जीव देणारे आम्ही , एक दुसऱ्याचा जीव घेण्यात धन्यता मानत आहोत . असा हा गौरवशाली महाराष्ट्र आम्ही तमाशाचा फड करुन टाकला आहे. आज एकाचा मोर्चा तर उद्या दुसऱ्याचा प्रतिमोर्चा , आज एका भावाचा बंद !तर उदया दुसऱ्या भावाचा बंद ! !यात वेठीस धरली जाती सर्वसामान्य जनता, भरडले जातात निष्पाप जीव, बायाबापुडे व पोरंसोरं, त्यांना काहीच नसते सोयरसुतक या बळी गेलेल्या निष्पाप जीवाचं कारण आतंकवाद व दहशतवादाला नसतेच कोणतीही जात व धर्म .ना नसतो त्यास कोणताही रंग , ना हिरवा .ना भगवा . ना निळा ना पिवळा , हे सारं रोखायचं असेल तर शिवराय, फुले, शाहू , आंबेडकर , तुकोबाराय आदि संत व महापुरुषांचे खरे( बेगडी नव्हे) विचार आचरणात आणावे लागतील. आम्ही जेव्हा समानतेचा, मानवतेचा व बंधुत्वाचा अंगीकार संविधानकृत लोकशाहीत करतो, तेव्हा मी मोठा का तु मोठा ? या गोष्टीचा ( अट्टाहास) कलगीतुरा कशासाठी ?

You May Also Like

0 Comments