भीमा कोरेगाव घटनेचे भोकरदन येथे पडसाद; बाजारपेठ बंद
भीमा कोरेगाव घटनेचे भोकरदन येथे पडसाद; बाजारपेठ बंद
भोकरदन (अनीस भारती )
भोकरदन : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी भोकरदन शहरतही उमटले. संतप्त युवकांनी भोकरदन शहरातून मोर्चा काढून शहरातील बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला. . दरम्यान, सर्व ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.भीमा कोरेगाव येथे सोमवारी दोन गटात झालेल्या वादावरून दगडफेक झाली होती. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. भोकरदन शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानवांच्या पुतळ्याला हारार्पण व अभिवादन केल्यानंतर हा मोर्चा ,बांग्ला परिसर ते टीपू सुल्तान चौक,अण्णाभाऊ साठे चौक,जलना रोड,शिवजी चौक ,सिल्लोड कॉर्नर ,उपविभागीय अधिकारी कार्यालय, परिसरातून मोर्चा धडकला. व बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी उपविभागयधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काही समाजकंटकांनी दगडफेक करीत भ्याड हल्ला केला. या घटनेचा निषेध म्हणून भोकरदन शहरात आंबेडकरी अनुयायांसह सर्वच स्तरातील नागरिकांनी मोर्चा काढून भीमा कोरेगाव येथील घटनेतील दोषींविरूद्ध कारवाईची मागणी केली. संबंधित घटनेतील समाजकंटकांवर त्वरीत कारवाई करावी, दोषींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी अन्यथा लोक शाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिला.
0 Comments