पोलीसांनी अकरा दुचाकीवर कारवाई करून दंड वसूल केला,

by - 20:26

पोलीसांनी अकरा दुचाकी वर कारवाई करून दंड वसूल केला,

नो पार्किंग साठी प्रत्येक दोनशे रुपये दंड ठोकला

(भोकरदन इम्रान खान)
नो पार्किंग मध्ये असलेल्या अकरा दुचाकी वाहनावर पोलीसांनी कारवाई करून प्रत्येकी दोन शे रूपये असे दंड आकारून परत नो पार्किंग मध्ये वाहने उभी करू नये असे करून सोडुन दिले तर अकरा पैकी एक दुचाकी पोलिसांनी कोर्टात जमा केली कारण सदरील वाहन मालक आला नसल्यामुळे कोर्टात जमा करण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले या विषय सविस्तर वृत्त असे की शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याने अनेक नागरिका सदरील वाहने देखील नो पार्किंग मध्ये उभी करून आपले कामा करीत असलने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे या साठी पुर्वी पोलिसांनी अनेक उपाय योजना राबविली पण काहीच फायदा त्या वेळी झाला नसल्याचे बोलले जात आहे मोहत्वाचे म्हणजे मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एस बी आय आणी एस बी एच या दोन्ही बॅका एकत्र आल्यामुळे शिवाजी चौकात वाहतुकीचीकोंडी नेहमी राहते विषेश म्हणजे बॅकेत आलेल्या नागरीकांना कसलीही पार्किंगची वेवस्था देखील नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे अनेकांनी सांगितले आहे खरेतर अशा वाहन धारकांना प्रशासनाने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे पोलीस आणी दुचाकी वाहन धारकांना हुज्जत घालावे लागते मोठी बाब म्हणजे येथील मध्यवर्ती बस स्थानकात मोठी जागा आहे तरी नागरीकांनी त्या ठीकाणी आपले वाहने उभी करावी असे प्रशासनाचे बोलने आहे दरम्यान अकरा वाहना पैकी एक दुचाकीचे मालक देखील आले नसल्याने एक दुचाकी कोर्टात जमा करण्यात आली असल्याचे सुत्रानी सांगितले प्रत्येक दुचाकी धारकाकडुन दोन शे रूपये दंड वसूल करण्यात आला आहे

You May Also Like

0 Comments