भोकरदनमध्ये व्हाईटनरच्या नशेचा जीवघेणा विळखा

by - 00:41

भोकरदनमध्ये व्हाईटनरच्या नशेचा जीवघेणा विळखा

अवघ्या 10 ते 12 रुपयांमध्ये कोणत्याही स्टोर वर मिळतात व्हाईटनरच्या पेन आणि डब्बिया  शहरातल्या सुनसान  भागात नशे करणारी पोरं आढळतात


भोकरदन  : भोकरदन मधील तरुणाई सध्या अगदी स्वस्तात करता येणाऱ्या नशेच्या आहारी गेली आहे. अवघ्या 10 ते 12 रुपयांमध्ये कोणत्याही स्टोर वर मिळतात व्हाईटनरच्या पेन आणि डब्बिया  शहरातल्या सुनसान भागात नशे करणारी पोरं  आढळतात त्यांना ट्रान्समध्ये घेऊन जाणारा हा नशा आहे... व्हाईटनरचा... याच व्हाईटनरला कायमचं पुसून टाकण्यासाठी भोकरदन  पोलिसांनी मोहीम हाथी  घेण्याची गरज आहे.कोणत्याही स्टेशनरी स्टोअर्समधून व्हाईटनर घेतलं जातं... त्याचे दोन थेंब रुमालात टाकले जातात... ते जोरात हुंगले... की मग या जगाशी संपर्कच तुटतो...धक्कादायक गोष्ट ही, की भोकरदन शहरात ही नशा करणाऱ्यांचं वय हे आठव्या वर्षापासून सुरु होतं. फक्त व्हाईटनरच नाही.. तर स्टिकफास्ट... नेलपॉलिश, पेट्रोल, डिझेल अशा पदार्थांचं व्यसन पोरांना जडलं आहे. पण हे ओळखायचं कसं? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. व्हाईटनरपासून सुरु झालेलं हे व्यसन... थेट ड्रग्ज आणि दारुपर्यंतही पोहोचू शकतं. शिवाय याचे शरिरावर होणारे परिणामही तितकेच घातक आहेत. त्यामुळे क्षणभराच्या सुखासाठी आयुष्य धोक्यात घालू नका... व्हाईटनरची ही नशा...तुमचं आयुष्य पुसून टाकेल.या कड़े पालकांनी लक्ष द्यावे. व्हाईटनरचा नशे  करणारे पोरांवर  पोलिसांनी कार्यवाही केलि पहिजे अशी चर्चा शहरात चाल्ली आहे याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे .. 
व्हाईटनर,स्टिकफास्ट,नेलपॉलिश, बाम ,ई पदार्थ  हे ड्रग्स एंड कॉस्मेटिक एक्ट हे अधिनियम्मा खली येतात  या पधार्थाचा रिकॉर्ड अन्न व औषध प्रशासनाने ड्रग्स एंड कॉस्मेटिक एक्ट या अधिनियिम प्रमाणे तपासणी करून कार्यवाही करावी . 
अनीस भारती (अध्यक्ष :राहत फाउंडेशन भोकरदन ) 












You May Also Like

0 Comments