तालुक्यातील शासनाचेच अनेक शौचालय नादुरुस्त,प्रशासनाची उदासिनता

by - 19:00

तालुक्यातील शासनाचेच अनेक शौचालय नादुरुस्त,प्रशासनाची उदासिनता

(भोकरदन दस्तक ऑनलाइन : इम्रान खान)

उघड्यावर शौचालयास बसाल तर खैर नाही प्रत्येकांनी शौचालय बांधुन त्याचा वापर करा असे शासनाचे धोरण असले तरी तालुक्यातील शासनाचेच अनेक शौचालय नादुरुस्त अवस्थेत सापडत आहे असे असले तरी या साठी दोष कोणाचा हे सांगण्याची गरज नाही कारण तालुक्यातील अनेक गावात शासनाने पुर्वी लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या शौचालये गेल्या अनेक वर्षापासून वापर विना पडुन आहे याचा फायदा देखील घेता येत नसल्याचे अनेकांनी सांगितले विषेश म्हणजे एकीकडे शासन स्वच्छ भातर मिशन अंतर्गत शौचालय कडे अधीक भर देत असले तरी तालुक्यातील अनेक भागात शासनाचे शौचालय असुन अडचण नसुन खोळंबा होत आहे विषेश म्हणजे संबधीत असलेल्या प्रशासनाला या विषय विसर पडला असल्याचा आरोप केला जात आहे मोहत्वाचे म्हणजे अनेकांनी आपल्या घरी नवीन शौचालय बांधुन त्याचा वापर करत आहे तर अनेक या पासुन वंचित असल्याचे चित्र आहे खरेतर ही फार चिंता दायक बाब आहे भोकरदन शहरातील नगर पालीकेने शासनाचे असलेल्या अनेक शौचालय दुरूस्ती करून त्या वापर योग्य बनवले आहे खरेतर पालीकेचा सत्कार करावा असे वाटत आहे दरम्यान प्रशासनाला नादुरुस्त शौचालयाचा विसर पडला आहे कारण वरीष्ठ पातळीवर अस्तित्वात असलेल्या अधिकारी यांचा धाक शिल्लक राहिला नसल्याचे समजते विशेष म्हणजे शासनाचे आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आपली भुमिका संबधीत असलेल्या प्रशासन राबवत असल्यामुळे नागरीकांत संतापाची लाट पसरत आहे वारंवार सांगुन सुद्धा मात्र या कडे मुद्दाम कानाडोळा केला जात असल्याचा आरोप तालुक्यातील अनेक गावातील चांडाळ चौकडी चर्चा करीत आहे दरम्यान संबधीत प्रशासन शासनाची दिशाभूल का करीत आहे जुने असलेल्या शौचालय दुरूस्ती करून वापरण्यायोगी बनविले तर लोटा बहादूरांना याचा फायदा होईल आणी आरोग्य वर याचा दुष्परिणाम ताळता येईल पण प्रशासन या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नवल वाटत आहे तरी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालण्याची मागणी नागरीकातुन करण्यात येत आहे आणी दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुध्दा जोरधरत आहे.
Top Mobile Downloads

You May Also Like

0 Comments