भोकरदन : महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात शेख कलीमने गमावले प्राण,भर धाव ट्रक ने चिरडले,महिला जखमी

by - 14:40

भोकरदन शहरात भीषण अपघात,भर धाव ट्रक ने युवकास चिरडले,महिला जखमी
 


भोकरदन दस्तक प्रतिनिधी,
भोकरदन शहरातील उस्मानपेठ रहिवासी येथील युवकाला एक भर धाव ट्रक ने मागून जोरदार टक्कर देऊन चिरडले,युवक जागीज ठार,तर सायरबी शेख पाश्शु ही महिला जखमी झाली आहे. 

सविस्तर वृत्त असे की भोकरदन येथील उस्मानपेठ येथील युवक शेख कलीम शेख रईस,वय 17 वर्ष हे दुचाकी वरून कामा निमित्ताने जालना रोड या दिशेने जात असताना, गिरणारे हॅस्पिटल, भन्साळी लोह भांडार, समोर ,मागून भरधाव ट्रक (जी जे 26 टी 5961) ने जोरदार टक्कर दिल्याने शेख कलीम शेख रईस हे युवक जागीच ठार झाला आहे,या अपघातता नंतर घटना स्थळवर वातावरण पांगला होता पण भोकरदन शहर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन युवकाचा मृतदेह सरकारी दवाखाना येथे शवविच्छेदना साठी पाठवून वातावरण, आटोक्यात आणले,विशेष म्हणजे,या रोड वर खासगी वाहने,तासंतास वाहने उभे करून देतात, त्यामुळे या जालना रोड वर पाईचालणारे, व दु चाकी वाहन,चालक यांना येथे ये जा करणे म्हणजे तारेवर्ती कसरत करावी लागत आहे,शहरात ट्रॅफिक नियम नाहीच आहे, येथील दुकानदार आपल्या दुकाना समोर जड वाहने उभी करून देत असल्याने या रोड वर ट्रॅफिक होत आहे ज्यामुळे निष्पाप लोकांची बळी जात आहे,अश्या दुकानदारावर ही संबंधीत विभाग ने कार्यवाही करावी अशी मांग जाणते तुन होत आहे,पुढील तपास भोकरदन पोलीस करत आहे,
==============

You May Also Like

0 Comments