संतूर उत्पादकांच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त रांगोळी स्पर्धा संपन्न

by - 19:31

संतूर उत्पादकांच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त रांगोळी स्पर्धा संपन्न

विद्यार्थी ,माता पालकांनी रागोळीतून विविध आकार

भोकरदन दस्तक  ऑनलाइन _अजय बोराडे 

भराडी येथील होली फेथ इंग्लिश मधे मकर संक्रांतीच्या ओचित्यने संतूर उत्पादकाच्या वतीने विद्यार्थी व माता पालकांकरीता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आणि श्रीभृन हत्या,देशप्रेम,पर्यावरण जतन,पानी बचत,श्रीचेतना,मुलींचे शिक्षण,झाडे जगवा,स्वच्यता आदि विविध विषयांवर आधारित उत्कृष्ट व सुंदर रांगोळ्यांचे रेखाटन केले .या स्पर्धेत अमृता संतोष सोनवणे हिने प्रथम, वर्षा बिलंगे यांनी द्वितीय आणि आशा जावळे यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, तसेच सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. स्पर्धेचे अध्यक्षस्थान श्रीमती शारदाताई महाजन सरपंच भराडी,मनीषा बावस्कर,संजना साकला आदिसह शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षकवृंद उपस्तिथ होते.
Top Mobile Downloads

You May Also Like

0 Comments