भोकरदन : दिव्‍यांगासाठी राखीव निधी खर्च करण्‍याची मागणी

by - 17:37

भोकरदन : दिव्‍यांगासाठी राखीव निधी खर्च करण्‍याची मागणी

भोकरदन नगर परिषदचे कार्यालयीन अधिक्षक श्री वामन आडे,यांना निवेदन देतांना नगरसेवक अब्दुल कदीर ,अंपग संघटनाचे पदाधिकारी बाबुराव पगारे ,रफिकखान पठाण,सामाजिक कार्यकर्ते मुमताज़ मदनी,दिपक तळेकर ,पाशु भाई,आदी उपस्थित होते.(छायाचित्र :भोकरदन दस्तक टीम  )
भोकरदन (प्रतिनिधि)
दिव्‍यांगासाठी राखीव निधी अपंग नागरिकांसाठी राखीव ठेवण्‍यात आलेल्‍या 3%निधी भोकरदन नगर परिषद हदृीतील अपंगासाठी खर्च करणे,या विषयी मुख्‍याधिकारी यांना निवेदन देण्‍यात  आलेआहेत निवेदनात म्हटले आहे , शासनाने अपंग नागरिकांच्‍या कल्‍याणासाठी अपंग नागरिकांसाठी समान संधी संरक्षण व समान सहभाग कायदा लागु केला आहे. सदर कायदयातील कलम 40 अन्‍वये सर्व नागरी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था यांनी अपंगासाठी किमान 3% निधी राखीव ठेवण्‍याबाबत शासन निर्णय झालेले आहे. सदर निधीचा भोकरदन शहरातील अपंगाच्‍या कल्‍याणसाठी खर्च करण्‍याकरिता भोकरदन नगर परिषदेच्‍या दिः22/12/2017 रोजी च्‍या सर्वसाधारण सभे मधिल ठराव क्र 4 असुन सदर निधी खर्च करण्‍यासाठी सर्वानुमते मंजुर करण्‍यात आले असुन, तरी देखील आता पर्यत सदर निधी खर्च करण्‍यात आला नाही. तरी चालू आर्थिक वर्षात अपंग नागरीकांना त्‍यांचा हक्‍क देण्‍यात यावा.तसेच या निधीत दिव्‍यांग नागरिकांना सुविधा उपलब्‍ध करून दयाव्‍या.निवेदनात अपंगाच्‍या उदरनिर्वाह ,व्‍यवसाय,साहित्‍य, खरेदी करण्‍याकरिता निधी थेट लाभार्थ्‍याच्‍या खात्‍यात जमा करावा.अंपग शालेय शिक्षण खेळाडुकरिता शिष्‍यवृत्‍ती देण्‍यात यावी. स्‍थानिक बस स्‍टॅड मध्‍ये व्‍हिल चेअर उपलबध करून देणे अपंगाना पेंशन योजना सुरू करणे हे मुख्या मांगणया आहे सदर निधी लवकरात लवकर खर्च करावा.नसता लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन छेडण्‍यात येईल याची सर्वस्‍व जबाबदारी शासनाची राहील.या निवेदनाच्या प्रति मा.प्रधान सचिव, नगर विकास विभाग मंत्रालय, मुंबई. मा. प्रधान सचिव सामाजिक न्‍याय, व विशेष सहाय विभाग मुंबई मा. आयुक्‍त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचनालय, वरळी, मुंबई. मा विभागीय आयुक्‍त,विभागीय आयुक्‍त कार्यालय औरंगाबाद, मा.जिल्‍हाधिकारी, जिल्‍हाधिकारी कार्यालय जालना मा.उपविभागीय अधिकारी.उपविभागीय आधिकारी कार्यालय भोकरदन मा.तहसिलदार, तहसिल कार्यालय, भोकरदन.यांना पाठविण्यात आलेले आहे.
    निवेदनावर नगर सेवक शेख अब्दुल कदीर,अंपग संघटनाचे पदाधिकारी बाबुराव पगारे ,रफिकखान पठाण,सामाजिक कार्यकर्ते मुमताज़ मदनी,दिपक तळेकर ,पाशु भाई,आदी सह्या आहेत.

You May Also Like

0 Comments