भोकरदन तालुक्यात भिषण अपघातात तीन ठार

by - 21:27

भोकरदन तालुक्यात भिषण अपघातात तीन ठार,
*अज्ञात वाहनाने चिरडले*



(भोकरदन प्रतिनिधी)
तालुक्यातील मालखेडा ते मुठाड फाट्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने दुचाकी सवाराला चिरडले त्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना एका फुलंब्री जवळपास वाटातच मृत्यू झाला राहुल एकनाथ जगताप वय २२.वर्षे.जितेंद्र रतन जगताप वय २२.वर्षे राहुल सदाशिव जगताप वय २३.वर्षे असे मयताचे नाव आहे सर्व रा.शिवना ता.सिल्लोड जि.औरंगाबाद येथील रहिवासी आहे या विषय सुत्रा कडुन मिळालेली माहिती अशी की वरील तिघेही लगनाचे पत्रिका वाटण्यासाठी भोकरदन तालुक्यातील आले होतो नंतर परत जात असताना शहरापासुन आठ कि.मी अंतरावर असलेल्या मुठाड ते मालखेडा फाट्या दरम्यान पाच वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला या विषय घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटना स्थळी धाव घेतली आणी नागरीकांचे मदतीने सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले या दोन जन जागीच ठार झाले होते तर एक गंभीर जखमी झाला होता तर त्याला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकिय रूग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटातच त्याचा मृत्यू झाला असल्याचे सुत्रांनी सांगितले या विषय पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे पुढील तपास पोलीस करीत आहे.

You May Also Like

0 Comments