भोकरदन : विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणारी इंडिका कार नऊ हजाराच्या दारूसह जप्त

by - 15:00

विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणारी इंडिका कार नऊ हजाराच्या दारूसह जप्त  ●भोकरदन पोलिसांची कारवाई●

भोकरदन (प्रतिनिधी)
खबऱ्यामार्फत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भोकरदन पोलिसांनी कारवाई करत आठ हजार चारशे रुपयांची विदेशी दारू व अंदाजे ५० हजार रुपये किमतीची इंडिका कार जप्त केली आहे. 
भोकरदन पोलिसांना दि.(२) रोजी खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की सिल्लोड हुन भोकरदन कडे पांढऱ्या रंगाची इंडिका गाडी क्र एम.एच.२३ इ ८६४९ ही विदेशी दारूची चोरट्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने येत आहे.यावरून पोलिस उपनिरीक्षक साखळे, पोकॉ विजय जाधव, पोकॉ पायघन, पोकॉ देवकर हे भोकरदन-सिल्लोड रोडवरील महाराष्ट्र हॉटेल च्या बाजूला दबा धरून बसले.मिळालेल्या माहितीनुसार रात्री ९ वाजेच्या सुमारास सिल्लोड कडून भोकरदन कडे येणारी इंडिका गाडी पोलिसांनी पकडली व गाडीचालक गणेश रमेश दसरे रा.सिपोरा बाजार याला ८ हजार चारशे रुपये किमतीच्या विदेशी दारूसह ताब्यात घेतले.पोकॉ जाधव यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ)(ई), ८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विदेशी दारू | फाइल फोटो 


You May Also Like

0 Comments