जवाहर नवोद्यच्या परिक्षा पारदर्शक व कॅापी मुक्त घ्याव्या-अब्दुल कदीर

by - 14:52

जवाहर नवोद्यच्या परिक्षा पारदर्शक व कॅापी मुक्त घ्याव्या-अब्दुल कदीर


भोकरदन दस्तक ब्युरो
भोकरदन शहरात व तालुक्यात दिनांक २१ /०४/२०१८ रोजी होणाऱ्या जवाहर नवोदय परीक्षा पारदर्शक व कॉपी मुक्त घ्यावा अशी मंगनीचा निवेदन गट शिक्षण अधिकारी यांना नगर सेवक अब्दुल कदीर यांनी दिले आहे.

निवेदनात असे म्हटले आहे की जवाहर नवोदय परीक्षा ह्या होतकरू,हुशार,गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी या परीक्षा शासनाच्या वतीने घेण्यात येतात ,परन्तु मागील वर्षाच्या निकाल पहिल्या नंतर असे निदर्शनास आले की जवाहर नवोदय परीक्षेत कॉपी करून फक्त निवडक व शिक्षकांचीच मुले या परीक्षेत पात्र ठरतात होतकरू,हुशार,गरीब व गरजवंत विध्यार्थी या कॉपी व वशिले बाजी मुळे मागे राहतात व कॉपी करणारे आणि वशिले बाज शिक्षकांचे मुले पुढे येतात. 

भोकरदन शहरात व तालुक्यात होणाऱ्या परीक्षा कॉपी मुक्त तसेच परीक्ष्य केंद्रावर गार्डिंग साठी येणारे शिक्षक हे दुसऱ्या केंद्रातील असावे व परीक्षेची संबधित शिक्षकही  केंद्रावर असावे इतर कोणलाही परीक्षा केंद्रावर राहू  देऊ  नये ह्या परीक्षा पारदर्शक घ्यावे.अशी मागणीच्या निवेदन गट शिक्षण अधिकारी भोकरदन ,तहसिलदार भोकरदन व तसेच उपविभागीय अधिकारी भोकरदन यांना नगर सेवक अब.कदीर यांनी निवेदन दिले आहे


भोकरदन शहरात जिल्हा परिषद प्रशाळा नवे भोकरदन मध्ये ४४० कन्या शाळा वर ४४० न्यु हायस्कूल ४४० व शिवाजी महाविद्यालय ४४५ असे एकुण १७४५ विध्यार्थी जवाहर नवोद्यची परिक्षा देणार आहे,यात बहुतेक विद्यार्धी हे होतकरू,हुशार,गरीब व गरजवंत आहेत,जर जवाहर नवोद्यच्या परिक्षा पारदर्शक व कॅापी मुक्त झाल्या तर या होतकरू,हुशार,गरीब व गरजवंत  मुलां यांचा लाभ होईल
 ---------------------------------------------------------
अब्दुल कदीर( नगर सेवक ,भोकरदन )

You May Also Like

0 Comments