पवित्र रमजान महिन्यात नळाला एक दिवस आड पिण्याचा पाणी वेळेवर सोडण्याची, शहरात स्वच्छता ठेवणे ,व न दुरुस्त हाथ पम्प तात्काळ दुरुस्त करणे,व बंद पडलेले पथ दिवे चालू करण्याची मागणी

by - 14:15

पवित्र रमजान महिन्यात नळाला एक दिवस आड पिण्याचा पाणी वेळेवर सोडण्याची, शहरात स्वच्छता ठेवणे ,व न दुरुस्त हाथ पम्प तात्काळ दुरुस्त करणे,व बंद पडलेले पथ दिवे चालू करण्याची मागणी



भोकरदन शहराततील नूर सोशल ग्रुप भोकरदनच्या वतीने न.प भोकरदनच्या मुखाधिकारी श्री अमित कुमार सोंडगे यांना निवेदन देण्यात आला, निवेदनात म्हटले आहे कि,17 मे 2018 पासून मुस्लीम बांधवाचा पवित्र सन रमजानची सुरुवात होत आहे,करिता शहरात स्वच्छता ठेवून तसेच रमजान सन हे कडक उन्हात येत असल्याने समाज बांधाव व मुस्लीम महिला यांना भर उन्हात हंडा भर पाण्यासाठी वण वण भटकंती करावी लागतात,तर शहरात न.प. च्या वतीने पिण्याच पाणी सोडण्याची वेळ निश्चित नसल्याने कोणत्याही वेळी नळाला पाणी सोडण्यात येत आहे.त्यामुळे उपहास ठेवणाऱ्या समाज बांधव आणि भगिनींना याचा फार त्रास सहन करावा लागत आहे.न.प.प्रशासन ने एक दिवस आड नळाला स्वच्छ पाणी सकाळी 7 वाजेचा सुमारास सोडण्यात यावे.व शहरात ठीक ठिकाण चे पथ दिवे,तसेच मास्जीद समोरील बंद पडलेले पथ दिवे तत्काळ चालू करण्यात यावा.तसेच शहरातील न दूरुस्त हाथ पम्प तत्काळ दुरूस्त करण्यात यावी.व शबे कदर च्या दिवशी व रमजान इद चा दोन दिवस अगोदर ते ईद पर्यंत नळाला पाणी सोडण्यात यावा तसेच ईद गाह वर शहरातील मुस्लीम बंधव ईद ची नमाज अदा करण्या साठी जास्त संख्यात येत आहे.पुरेसे मंडप नसल्याने समाज बांधाव भर उन्हात ईद ची नमाज अदा करतात तरी मंडपाची संख्या वाढविण्यात यावी. मुस्लीम बांधवाचा भावनाचा आदर करून मागण्या पूर्ण करण्यात याव्या अशी मागणी नूर सोशल ग्रूप तर्फे मुख्याधिकारी नगर परिषद भोकरदन यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.व शेवटी मागण्या मंजूर न झाल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात करण्यात आला आहे.निवेदनावर नूर सोशल ग्रूपचे अध्यक्ष महेबूब भारती, जाकेर पठाण,सय्यद नासेर भाई (समाज सेवक),शेख जलील, सुखदेव सावंत(समाज सेवक ),एम ए अजीज ,शेख मिया भाई ,शेख मुस्तकीम,विनोद गायकवाड,अनिल पगारे(ता.अ.रीपुब्लीकन सेना ),राहुल पारखे ,अनीस शाह (शहर अध्यक्ष बसपा ),आनीस भारती ,सलमान खान ,विट्ठल पवार,सय्यद पश्षु,आदींचे स्वाक्षऱ्या आहे.

You May Also Like

0 Comments