भोकरदन तालुका पत्रकार संघाला मिळाला वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार

by - 18:47

 भोकरदन तालुका पत्रकार संघाला मिळाला वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार 

भोकरदन प्रतिनिधि 
भोकरदन तालुका मराठी पत्रकार संघाला पुरस्कार मिळाल्या बद्दल भोकरदन नगर परिषद सभागृहात नगराध्यक्षा ,मंजुषाताई राजाभाऊ देशमुख यांनी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश देशपांडे यांचा सत्कार केला व सर्व पत्रकाराचे अभिनंदन केले यावेळी मुख्याधिकारी अमित सोंडगे ,माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख उपनगराध्यक्ष इर्फानोद्दीन सिद्धिकी ,गटनेते संतोष अन्नदाते , कदिर बापू राहुल ठाकूर , आशाताई माळी गयाबाई रमेश जाधव , संध्याताई सुरेश शर्मा, हंमदू चाऊस , यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्तीत होते • पुरस्कार मिळाल्या बद्दल भोकरदन तालुका पत्रकार संघाचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे • 
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा वसंतराव काणे, हा आदर्श तालुका पत्रकार संघाला दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार भोकरदन तालुका पत्रकार संघाला मिळाला आहे.दि २४ रोजी मिळाला आहे.हा पुरस्कार सिक्कीम राज्याचे राज्यपाल महामहिम, डॉ.श्री श्रीनिवास पाटील साहेब यांच्या हस्ते, पाटण ( जिल्हा सातारा ) येथे एका भव्य कार्यक्रमात, तालुकाध्यक्ष महेश देशपांडे, यांचे शाल श्रीफळ सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी महेश देशपांडे यांचे सोबत पत्रकार संघाचे पदाधिकारी , जिल्हाकार्याध्यक्ष फकिरा देशमुख ज्येष्ठ पत्रकार विजय सोनवणे, सुनील जाधव. यांचा ही सन्मान करण्यात आला 
सिक्कीम चे राज्यपाल डॉ श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर, आमदार शंभूराज देसाई, संदीप देशपांडे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमुख, सिद्धार्थ शर्मा,विश्वस्त किरण नाईक, राज्यसरचिटणीस अनिल महाजन सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पटणे पाटण तालुकाध्यक्ष शंकर मोहिते यांची प्रमुख उपस्तिती होती •

औरंगाबाद विभागातून भोकरदन तालुका मराठी पत्रकार संघा च्या , पत्रकार संघटन, व केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ,परिषदेने वसंतराव काणे ,आदर्श तालुका पत्रकार संघ, म्हणून निवड केली व पाटण येथे संपन्न झालेल्या पत्रकाराच्या राज्यस्तरीय तालुकाध्यक्ष व सर्व पत्रकाराच्या मेळाव्यात, राज्यातून आठ विभागातून निवड झालेल्या तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ ,सन्मान पत्र ,स्मृती चिन्ह देऊन , पुरस्कार प्रदान केला


पाटण येथ झालेल्या संपन्न पुरस्कार वितरण सोहळ्यात, सिक्कीम चे राज्यपाल डॉ, श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते आदर्श तालुका पुरस्कार स्वीकारताना तालुकाध्यक्ष महेश देशपांडे , जिल्हाकार्यध्यक्ष फकिरा देशमुख ,जेष्ठ पत्रकार विजय सोनवणे ,सुनील जाधव व इतर मान्यवर •

You May Also Like

0 Comments