भोकरदन येथे श्री स्वामी समर्थ महाराज पालखी सोहळा उत्सहात

by - 21:29

भोकरदन येथे श्री स्वामी समर्थ महाराज पालखी सोहळा उत्सहात

भोकरदनमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची टाळमृदुगांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत सहभागी सेवेकरी.

भोकरदन /प्रतिनिधी
      भोकरदन शहरातील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार दिंडोरी प्रणित केंद्रात बुधवारी दिनांक ५ रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची शहरातून टाळ मृदुगांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
      भोकरदन शहरातील जुनी बाजार पट्टी परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये प.पु.गुरुमाऊली यांच्या  आशीर्वादने व चंद्रकांतदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाने सिध्दमंगल पादूका पुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिनांक ६ व ७ रोजी साक्षात परब्रम्ह भगवान श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंहसरस्वती गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदुकांचे पूजन होणार आहे. बुधवारी पादुका शहरात आल्या असता येथील स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने शहरातील पोस्ट ऑफिस, प्रशाद गल्ली, खंडोबा गल्ली, धोबी गल्ली, लालगढी, देशमुख गल्ली, सराफा मार्केट भागातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी सेवेकऱ्यांनी पालखी मार्गात आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. महिला भाविकांनी महाराजांच्या पादुकांची आरती ओवाळून स्वागत केले. याशिवाय पेरजापुर भजनी मंडळी मिरवणूकीत सहभागी झाले होते. टाळमृदुगांच्या गजरात भजन, कीर्तन, स्वामी नामस्मरणामुळे सर्व वातावरण भक्तिमय झाले होते. पालखी मिरवणूक सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुष सेवेकरी सहभागी झाले होते. होती.

पादुका दर्शनाचा लाभ घ्या.     

 श्री स्वामी समर्थ केंद्रात सिद्धमंगल पादुका पूजनाच्या निमित्ताने साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आल्या असून, या पादुका तीन दिवस केंद्रात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी पादुका पूजनाचा लाभ घ्यावा असे श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने कळविण्यात आले आहे.

You May Also Like

0 Comments