भोकरदन येथे पावसासाठी विषेश नमाजचे आयोजन

by - 21:50

भोकरदन येथे पावसासाठी विषेश नमाजचे आयोजन

भोकरदन येथे नमाज पढ़ता ना मुस्लिम बांधव

दुआ करतांना मुस्लिम बांधाव विस्तार आहे

(भोकरदन प्रतिनिधी)
जेव्हा आपले वाईट कर्म वाढले जात आहे तेव्हा अल्लाह आपला कोद्ध दाखवत आहे जर आपण आपल्या जीवणाला अल्लाहचे आदेशानुसार राबवत आहे तर त्याची रहमत आपल्यावर नाजील होतआहे
अल्लाह आपल्या कडुन नाराज आहे त्या मुळे पाऊस थांबला आणि वरूनराजा नाराज झाला त्या मुळे आपण आपल्या वाईट कर्माची अल्लाह कडे माफी मागावी तसेच तौबा करून अल्लाह कसा खुश होणार या साठी त्याचे फरमान पाळणे अतिशय गरजेचे असल्याचे मत मुस्लिम धर्मगुरू मौलाना हारून देशमुख यांनी सोमवारी येथील आलापुर परिसरातील ईदगा येथे विषेश नमाजाचे आयोजन करण्यात आले होते नमाजे इस्तेसखा पुर्वी आपल्या बयान मध्ये त्यांनी सांगितले ईदगा येथे मुफ्ती खालेद यांनी विषेश नमाज पठण केले त्या नंतर (खुतबा)म्हणजे मुस्लिम समाजाचे मुख्य पुस्तक पठण करण्यात आली नंतर नम डोळ्याने रडुरडु उघडे डोखे उलटे हाताने चांगला पाऊसासाठी व मुसळधार पाऊस पडावा यासाठी दुवा करण्यात आली विषेश नमाज पठण करण्यासाठी शहरातील मोठ्या संख्येने नागरीक व लहान मुले उपस्थित होते दरम्यान ईदगा मैदानावर शेळ्या बैल आदी मुक्या जनावरांना आनण्यात आले होते पाऊस नसल्यामुळे तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली असुन जमीनी बेजान होत चाल्ली तसेच  पिके धोक्यात सापडत आहे दरम्यान दमदार पाऊसासाठी तीन दिवसीय विषेश नमाज इस्तेसखाचे आयोजन करण्यात येत आहे सोमवारी सकाळी साडे दहा वाजता नमाज पठण करण्यात आली तसेच मंगळवार व बुधवार रोजी सकाळी साडे आठ वाजता नमाज पठण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले तरी सर्व मुस्लिम बांधवांनी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
दुआ साठी आलेले लहान मुले व सोबती आनलेले शेळ्या

You May Also Like

0 Comments