Powered by Blogger.

BHOKARDAN DASTAK

अल्पसंख्याकांनी त्यांचे योग्य स्थान व त्यांनी करण्यायोग्य कार्य कोणते आहे? 

या देशातील अल्पसंख्याकांनी त्यांचे योग्य स्थान कोणते आहे व त्यांनी करण्यायोग्य कार्य कोणते आहे? याचा नीट विचार करायला हवा. ही गोष्ट खरी आहे की तोंडी काहीही म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये, एक सांस्कृतिक समुदायाच्या नात्याने अल्पसंख्याकांचा कसलाही वाटा नाही. मग काय, केवळ बहुसंख्याकांचे हल्ले थोपविणे आणि शासन-व्यवस्थेत काही हिस्सा मिळविण्यात आपली सर्व शक्ती खर्ची घालणे, इतकेच तुमचे कर्तव्य आहे? मग देश कोठेही जावो, तुम्ही संख्येने कमी आहात, म्हणून दुर्बल आहात, असा तुमचा समज आहे, परंतु निर्णायक शक्ती ही संख्येचा कमी-अधिकपणा नसून, ती मानवतेच्या गुणांवर असते. संख्या कमी असणे हा अपराध नसून, जगाला देण्यासाठी तुम्हापाशी कोणतीही देणगी नाही, हा वास्तविक अपराध आहे. 

तुम्हापाशी उन्नत व सच्चरित्र समाज निर्माण करण्याचे सिध्दान्त आहेत आणि आपली तत्त्वे पटविण्यासाठी व आदराचे स्थान मिळविण्यासाठी आवश्यक असणारे नैतिक बल आहे, तर संख्येने तुम्ही कमी असलात तरी पर्वा नाही. कोणत्याही मानवसमुहास वजन व प्रतिष्ठा निर्माण करणारी बाब त्यांची संख्या नसते, तर त्यांच्या जीवनाचे सिध्दान्त व उच्च नैतिक चारित्र्याचे विभूषण मानव-समुदायात वजन व प्रतिष्ठा निर्माण करते. खेदाची गोष्ट अशी आहे की तिकडे तुमची नजर वळत नाही. पहिली गोष्ट अशी आहे की तुमचे दृष्टिकोन व तुमचे व्यवहार यांना आपल्या सांस्कृतिक वर्तुळात वेढून घेतले आहे. फार तर अनेक अल्पसंख्याकांशी संघटन करुन संयुक्त आघाडी उभारण्यापलीकडे तुम्ही जात नाही. हे सर्व उपाय स्वरक्षणाचे आहेत. 

हे उपाय यशस्वी जरी झाले, तर तुम्ही थोडक्यात अधिक शक्तीनिशी संघर्ष करु शकाल अथवा राजकारणात काही तात्कालिक लाभ मिळवू शकाल, यापेक्षा अधिक काही लाभ होणार नाही. हे नकारात्मक धोरण आहे. एखाद्या संकटाच्या भयाच्या भावनेने जे लोक एकत्र येतात, ते अधिक काळापर्यंत एकत्रित राहू शकत नाहीत. संकट नाहीसे झाले की ते विघटित होऊन विखुरले जातात. तुम्हापाशी जर सामाजिक सिध्दान्त काही सकारात्मक उद्देश व आकर्षून घेण्याची शक्ती नसेल, तर केवळ राजकारणाच्या लाभासाठी एकत्रित येणारे अल्पसंख्याकांचे समूह आपापसात डोकेफोड करुन एक वेगळाच उपद्रव निर्माण करण्यास कारणीभूत होतील. एखाद्या अल्पसंख्य समूहाला जर आदराचे स्थान प्राप्त करायचे असेल, तर त्याला एकच उपाय आहे. त्याने देशापुढे असे तत्त्व मांडावे, ज्यामुळे देशातील सद्यस्थितीतील विघटनवादावर व दुरावस्थेवर उपाय सिध्द होईल आणि त्यांनी स्वतःमध्ये अशी गुणवैशिष्ट्ये निर्माण करावीत ज्यांचा स्वीकार करण्यास जातीयवादी व्यक्तीही बाध्य होईल. 

इस्लामी राजकीय तत्व प्रणाली

Share
Tweet
Pin
Share
No Comments

भोकरदन येथे पावसासाठी विषेश नमाजचे आयोजन

भोकरदन येथे नमाज पढ़ता ना मुस्लिम बांधव

दुआ करतांना मुस्लिम बांधाव विस्तार आहे

(भोकरदन प्रतिनिधी)
जेव्हा आपले वाईट कर्म वाढले जात आहे तेव्हा अल्लाह आपला कोद्ध दाखवत आहे जर आपण आपल्या जीवणाला अल्लाहचे आदेशानुसार राबवत आहे तर त्याची रहमत आपल्यावर नाजील होतआहे
अल्लाह आपल्या कडुन नाराज आहे त्या मुळे पाऊस थांबला आणि वरूनराजा नाराज झाला त्या मुळे आपण आपल्या वाईट कर्माची अल्लाह कडे माफी मागावी तसेच तौबा करून अल्लाह कसा खुश होणार या साठी त्याचे फरमान पाळणे अतिशय गरजेचे असल्याचे मत मुस्लिम धर्मगुरू मौलाना हारून देशमुख यांनी सोमवारी येथील आलापुर परिसरातील ईदगा येथे विषेश नमाजाचे आयोजन करण्यात आले होते नमाजे इस्तेसखा पुर्वी आपल्या बयान मध्ये त्यांनी सांगितले ईदगा येथे मुफ्ती खालेद यांनी विषेश नमाज पठण केले त्या नंतर (खुतबा)म्हणजे मुस्लिम समाजाचे मुख्य पुस्तक पठण करण्यात आली नंतर नम डोळ्याने रडुरडु उघडे डोखे उलटे हाताने चांगला पाऊसासाठी व मुसळधार पाऊस पडावा यासाठी दुवा करण्यात आली विषेश नमाज पठण करण्यासाठी शहरातील मोठ्या संख्येने नागरीक व लहान मुले उपस्थित होते दरम्यान ईदगा मैदानावर शेळ्या बैल आदी मुक्या जनावरांना आनण्यात आले होते पाऊस नसल्यामुळे तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली असुन जमीनी बेजान होत चाल्ली तसेच  पिके धोक्यात सापडत आहे दरम्यान दमदार पाऊसासाठी तीन दिवसीय विषेश नमाज इस्तेसखाचे आयोजन करण्यात येत आहे सोमवारी सकाळी साडे दहा वाजता नमाज पठण करण्यात आली तसेच मंगळवार व बुधवार रोजी सकाळी साडे आठ वाजता नमाज पठण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले तरी सर्व मुस्लिम बांधवांनी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
दुआ साठी आलेले लहान मुले व सोबती आनलेले शेळ्या

Share
Tweet
Pin
Share
No Comments

ठाणे शहरात अरबी मदरसा चा वतीने पोलिस भरतीला आलेले हिन्दू युवकांची राहण्याची-जेवण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली 

या घोष वाक्याला लक्ष्यात घेउन जातीचा नसेल, पण या मातीचा आहे पश्न आपल्या भावाच्या भविष्यचा आहे.

हि बातमी नव्हे हिन्दू मुस्लिम एकते ची प्रतिक,आणि एकता अखंडता हिच आपल्या देशाची संस्कृती आहे .  

सविस्तार बातमी अशी की ठाणे शहरा मध्ये पोलीस भरती साठी आलेल्या महाराष्ट्राच्या विविध जिल्हयातील युवकांची मागील 3 दिवस पासून रात्री झोपण्याची सोय तसेच त्यांना रात्रीचे जेवण , पहाटे 4 वाजता नाश्ता- चहा तसेच त्यांना शौचालय व स्नानगृहाची व्यवस्था ठाणे शहरातील - मदरसा व मस्जिद सिद्दीक ए अकबर , पत्ता क्रांती नगर, राबोडी, ठाणे. यांच्या वतीने करण्यात येत आहे. आणि या युवकाना सर्व सुविधा मस्जिद कडून पुरविण्यात आली छायाचित्रात आपण बघू शकतात. 



Share
Tweet
Pin
Share
No Comments
Older Posts

About me

Follow Us

  • facebook
  • twitter
  • instagram
  • Google+
  • pinterest
  • youtube

Categories

recent posts

Sponsor

Facebook

Created with by ThemeXpose