Powered by Blogger.

BHOKARDAN DASTAK

नगर परिषद भोकरदन च्यावतीने पाणी पुरवठा करण्यात दुजाभाव, एक महिन्यापासून काजी मोहल्ल्यात पाणी नाही,नगर परिषद कुंभकर्ण झोपेत



भोकरदन प्रतिनिधी (अनिस भारती )
भोकरदन शहरात गेल्या 15 दिवसापासून मेन पाईप लाईन फुटल्याने शहरात पाणी टंचाई निर्माण झाली होती त्यामुळे शहरातील नागरिक हंडा भर पाण्यासाठी वणवण भटकत होते मेन पाईप लाईन दुसरुत झाली व शहरात पाणी पुरवठा सुरळीत झाला असून नगर परिषद भोकरदन च्या वतीने शहरात प्रत्येक वार्डात पाणी पुरवठा केले जातोय पण शहरातील जुना शहर म्हणजे काजी मोहल्ला,सुतार गल्ली,या मोहल्ल्यात नगर परिषद द्ववरा पाणी पुरवठा केला जात नाही,नप पाणी पुरवठा अधिकारी यांचा कडे येथील नागरिकांनी बऱ्याच वेळी तोंडी लेखी तक्रार केली पण त्याला या समस्या बद्दल काहीच घेणे देणे नाही,या बद्दल पाणी पुरवठा अधिकारी ला तक्रार केली तर ते म्हणतात की पाईप लाईन कुठे तरी चौकअप आहे,नेमका कुठे ना दुरुस्त आहे त्याला माहित नाही? पाईप लाईन चौक आप चे कारण पुढे करून जाणीवपूर्वक काजी मोहल्ल्यात पाणी पुरवठा केला जात नाही असे येथील नागरिकांचे बोलणे आहे पाईप लाईन एक महिन्यापासून ना दुरुस्त आहे ! पाईप लाईन नादुरुस्तिचे कारण सांगून मुद्दामहून काजी मोहल्ल्यातील नागरिकांना पाणी पासून वंचीत ठेवल्या जात आहे,तसेच नप तील कामचोर कर्मचारी या कडे लक्ष देत नाही ज्यामुळे येथील नागरिकांना एक हंडा भर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे,व हंडा भर पाणी विकत घ्यावे लागत आहे ज्यामुळे येथील नागरिकांना शारिरिक,मानसिक,आर्थिक त्रास या कामचोर अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे सहन करावा लागत आहे,तसेच वार्डातील नगरसेवकाना या होणाऱ्या समस्या कडे कधी लक्ष देतील अशी ही चर्चा नागरिक करत आहे निवडणूक झाल्या पासून दोघेही नगरसेवक वार्डात दिसलं नाही! सध्या उन्हाळा सुरू असलयामुळे पाणीची आवश्यकता जास्त प्रमाणात असते पण नप पाणी पुरवठा अधिकारी या कडे लक्ष देत नाही या पाणी सोडणारे कर्मचाऱ्यांना जर या बद्दल गल्लीतल्या लोकांनी फोन लावला तर ते ही उडवाउडवीचे उत्तरे देत आहे,काजी मोहल्ला परिसरातील टेकडा हा परिसर उच्च ठिकाणी असल्याचे कारण पुढे करून पाणी पुरवठा अधिकारी वेळ काडू पणा करीत आहेत याच परिसराला लागून बरेच मोहल्ले उच्च ठिकाणी आहेत येथे मुबलक पाणी पुरवठा नप द्ववरा करण्यात येत आहे काजी मोहल्ला प्रत्येक वेळी कोरडाच का?हा परिसर संपूर्ण अल्पसंख्याक असल्याने नप द्ववरा पाणी पुरवठा करण्यात दुजाभाव का? असे ही प्रशन येथिल नागरिक नगर परिषद भोकरदन कडून विचारत आहे,तसेच संबंधीत पाणी पुरवठा अधिकारी यांची बद्दली करून काजी मोहल्ल्याततील पाणी पुरवठा सुरळीत करून द्यावी अशी मांग येथील त्रस्त नागरिक नगर परिषद भोकरदन कडून करीत आहे व येथील नागरिक नप भोकरदन च्या विरोधात मोठ्या आंदोलन च्या पवित्रता आहे,


काजी मोहल्ला येथे नळाला पाणी येत नाही जर कधी आला तर फक्त 5 मिंट साठी येते ते ही कमी दाबाने,आमचा परिसर उच्च ठिकाणी असल्याने नळाला पाणी येतच नाही,,तरी नप ने तात्काळ पाणी पुरवठा करावा,
     खालिद शेख,,नागरिक,काजी मोहल्ला भोकरदन

काजी मोहल्ला येथील टेकडा परिसरात गेल्या महिन्या पासून नप द्ववरा पाणी पुरवठा केला गेला नाही ज्यामुळं आम्हाला पिण्याचे पाणी अव्वाच्या सव्वा दराने विकत घ्यावे लागत आहे,नप ने या होणाऱ्या समस्या कडे लक्ष देऊन वार्डात पाणी पुरवठा करावा,,

शेख तौसिफ, नागरिक काजी मोहल्ला भोकरदन
Share
Tweet
Pin
Share
No Comments
नफीस पहलवान इनका इंतकाल हो चुका है इनकी जनाजे नमाज तराबी नमाज के बाद होगी आलापुर के कब्रिस्तान में इंशा अल्लाह

Share
Tweet
Pin
Share
No Comments
आयेशा शेख चा जीवनाचा पहिला रोजा


भोकरदन प्रतिनिधी
भोकरदन येथील उस्मानपेठ येथील रहिवासी लाईन मॅन नाजीम शेख यांची मुलगी आयेशा शेख यांनी वया चा 7व्या वर्षी जीवना चा पहिला रोजा (उपवास) ठेवला आहे, विशेष म्हणजे या कडक उन्हाळ्यात आयेशाने कमी वयात उपवास ठेवल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहेत,
Share
Tweet
Pin
Share
No Comments
भोकरदन 15 मार्च (अनिस भारती प्रतिनिधी) 28 फरवरी 2021 रोजी भरधाव वेगाने मोटरसायकल ची टक्करने  गंभीर जख्मी झालेले  भोकरदन शहरातील  प्रतिष्टित नागरिक व सामाजिक कार्यकर्ता नसीम खा महबूब खा कुरेशी 52 वर्ष रा कुरेशी मोहल्ला भोकरदन यांच्या  रविवारी सकाळी  4 वाजेच्या सुमारास उपचार दरम्यान  निधन झाले आहे,

पोलिस सूत्रांकडून मिळालेली महिती अनुसार 28 फेब्रुवारी सकाळी 9:30 वाजेच्या दरम्यान शहरातील मच्छि मार्केट परीसरात नसीम खान कुरेशी आपल्या मित्रा सोबत उभे होते त्याच वेळी एक भरधाव मोटरसायकल MH 21बीपी 4468 स्वाराने मागून जोरदार धडक दिल्याने नसीम खा कुरेशी चा डोख्यात गँभीर मार लागल्याने ते जागीज बेशुद्ध होऊन पडले, त्यांना उपचार साठी भोकरदन येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते प्रथामउपचार करून औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारा दरम्यान नसीम खा कुरेशी याचे सकाळी4 वाजता,14 मार्च रोजी निधन झाले शवविच्छेदन औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात करण्यात आला व नमाज ए जानजा5:30 वाजता मार्कज मस्जिद येथे अदा करण्यात आली तसेच दफनविधी काजी मोहल्ला येथील कब्रस्तानात करण्यात आली आहे, असद खा महेबूब खा कुरेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोटरसायकल चालक अशोक काकासाहेब साबले निवासी आंबेगांव ता भोकरदन  चा विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे,मृत्यक चा परिवारात पत्नी।पांच मुली,एक मुलगाचा समावेश आहे,
Share
Tweet
Pin
Share
No Comments
भोकरदन मध्ये दारू पिऊन वाहन चालवणार्यांची संख्येत वाढ.मोठी हानी होण्याची शक्यता. 

महेबुब भारती भोकरदन 
दारू पिऊन वाहन चालवणे कायदेशीर गुन्हा आहे अश्या वक्ती विरुद्ध हिट अॅड रनचा गुन्हा दाखल होऊन खटला चालवून दंड शिक्षा अथधा दोन्ही पात्र आहे या संदर्भात वाहतुकीचे नियम या विषय गंभीर करण्यात आले आहे असे असले तरी भोकरदन मध्ये या नियमाचा मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे दारू पिऊन वाहन चालका कडून अनेक जीवघेने अपघात देखील घडून आल्याचे चित्र आहे मात्र या गंभीर प्रकाराकडे पोलिस प्रशासन मूकबधिरची भुमिकेत आढळून आली आहे शहरात या विषय संबंधित प्रशासनाकडुन कसलीही जन जागृती आज पर्यंत करण्यात आली नसल्याचा आरोप तालुक्यातील नागरीकांनी संताप वक्त करून सांगितले आहे शहरात मद्यधुंद अवस्थेत अनेक जन आढळून आले याची माहीती देखील पोलीस प्रशासनाला असुन सुद्धा कारवाई होत नसल्यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे त्याचबरोबर एखादी गोर गरीब वक्ती या विषय पोलीसांच्या सापळ्यात सापडून आल्यावर त्याला खाकीचा धाक आणी ओळखीच्या कडून वर हात काही असाच चित्र भोकरदन शहरात घडून येत आहे हे विषेश तळीराम स्वता शुद्धीत नाही तर ते दुसर्याचे जीव धोक्यात घालून बिनधास्त आपली वाहन चालवताना अनेकवेळा आढळून आले असे असले तरी पोलीस प्रशासन अशा वक्ती विरोधात मोहीम का राबवित नाही असा सवाल ही सामान्य नागरिकांना पडत आहे शहरात या संदर्भात तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे महत्वाचे म्हणजे मद्यधुंद दारूच्या नशेत वाहन चालवून तळीराम समोरच्या वाहनाला मागून घडकत आहे आणी धिंगाणा घालत समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अनेक सहकार्याचा मदतीने जास्त पैश्याची मागणी करीत असल्याचे बोललेजात आहे या सर्व बाबी पोलीसांना माहीत आहे मात्र ओळखीमुळे पोलीस प्रशासन पुढील कार्यवाही करीत नसल्याचा देखील आरोप करण्यात येत आहे तरी या विषय शहरात वाहन तपासणी मोहीम राबविण्यात यावी आणी दारू पिऊन वाहन चालवताना आढळून आले तर योग्य रित्या कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

दारूड्या वाहन चालकाकडून मोठा अपघात घडून येण्याची शक्यता. 

दारू पिऊन चार चाकी दुचाकी वाहने सर्रास चालवली जात आहे कारण शहरात खाकीचा धाक दाखील शिल्लक राहीला नसल्यामुळे या लोकांनी भर चौकात व नागरी वस्ती मध्ये मोठा धिंगाणा माडून ठेवला आहे दारू पिऊन दुसर्याचे जीवाची कसलीही पर्वा न करता खुलेआम बिनधास्त मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविली जात आहे ज्यामुळे मोठी हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही या विषय वरीष्ठ अधिकार्यांनी लक्ष केंद्रित करून अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी विविध समाजिक कार्यकर्ते कडून करण्यात येत आहे .
Share
Tweet
Pin
Share
No Comments
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा व मस्जिद जवळील देशी दारूचे दुकान हटवा नसता आमरण उपोषण!

भोकरदन दस्तक संपादक महेबूब भारती

भारतीय बौध्द महासभा,बौध्द व मुस्लीम समाज तसेच त्रस्त नागरीकांनी निवेदनाद्वारे दिला नगर परिषद प्रशासनाला इशारा"
भोकरदन:शहरातील सिल्लोड कॉर्नर वरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच मस्जिद जवळ असलेले देशी दारूचे दुकान त्वरित हटवावे नसता आगामी 16 मार्च पासून नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा बौद्ध, मुस्लिम बांधव व भारतीय बौद्ध महासभा आणि परिसरातील त्रस्त नागरिकांनी शुक्रवारी 5 मार्च रोजी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने नगर अभियंता किशोर ढेपले यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
 दरम्यान, तत्पूर्वी नवे भोकरदन भागातील रमाई नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पूज्य भदंत यांच्या नेतृत्वाखाली तोंडाला मास्क लावून अंत्यत शिस्तबद्धपणे सर्वजण नगर परिषद समोर आले. व याठिकाणी भदंत तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच त्रस्त रहिवाशांनी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख व किशोर ढेपले यांना निवेदन दिले.
 याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यापूर्वी ही विविध सामाजिक संघटना,पक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदन देऊन सदरील देशी दारूचे दुकान हटविण्याची मागणी केली आहे.तसेच नगर परिषद मध्ये सर्वसाधारण सभेत ही दुकान हटविण्यासंबधी ठराव मंजूर करण्यात आलेला आहे.विशेष म्हणजे मुख्याधिकार्यांनी दुकान हटविण्याची नोटीस देऊनही अद्याप दुकान हटविण्यात आले नाही.तसेच सदरील जागा क्रमांक 63 ही भाडे तत्वावर नोंदी नुसार जागा भाडे रजिस्टर ला आज रोजी किशोरलाल पितांबरलाल जैस्वाल रा औरंगाबाद यांचे नाव नोंद असून संबंधीताने देशी दारूचे दुकान इतर इसमास हस्तांतरित केले आहे.
Share
Tweet
Pin
Share
No Comments
Older Posts

About me

Follow Us

  • facebook
  • twitter
  • instagram
  • Google+
  • pinterest
  • youtube

Categories

recent posts

Sponsor

Facebook

Created with by ThemeXpose