नगर परिषद भोकरदन च्यावतीने पाणी पुरवठा करण्यात दुजाभाव, एक महिन्यापासून काजी मोहल्ल्यात पाणी नाही,नगर परिषद कुंभकर्ण झोपेत
नगर परिषद भोकरदन च्यावतीने पाणी पुरवठा करण्यात दुजाभाव, एक महिन्यापासून काजी मोहल्ल्यात पाणी नाही,नगर परिषद कुंभकर्ण झोपेत
भोकरदन प्रतिनिधी (अनिस भारती )
भोकरदन शहरात गेल्या 15 दिवसापासून मेन पाईप लाईन फुटल्याने शहरात पाणी टंचाई निर्माण झाली होती त्यामुळे शहरातील नागरिक हंडा भर पाण्यासाठी वणवण भटकत होते मेन पाईप लाईन दुसरुत झाली व शहरात पाणी पुरवठा सुरळीत झाला असून नगर परिषद भोकरदन च्या वतीने शहरात प्रत्येक वार्डात पाणी पुरवठा केले जातोय पण शहरातील जुना शहर म्हणजे काजी मोहल्ला,सुतार गल्ली,या मोहल्ल्यात नगर परिषद द्ववरा पाणी पुरवठा केला जात नाही,नप पाणी पुरवठा अधिकारी यांचा कडे येथील नागरिकांनी बऱ्याच वेळी तोंडी लेखी तक्रार केली पण त्याला या समस्या बद्दल काहीच घेणे देणे नाही,या बद्दल पाणी पुरवठा अधिकारी ला तक्रार केली तर ते म्हणतात की पाईप लाईन कुठे तरी चौकअप आहे,नेमका कुठे ना दुरुस्त आहे त्याला माहित नाही? पाईप लाईन चौक आप चे कारण पुढे करून जाणीवपूर्वक काजी मोहल्ल्यात पाणी पुरवठा केला जात नाही असे येथील नागरिकांचे बोलणे आहे पाईप लाईन एक महिन्यापासून ना दुरुस्त आहे ! पाईप लाईन नादुरुस्तिचे कारण सांगून मुद्दामहून काजी मोहल्ल्यातील नागरिकांना पाणी पासून वंचीत ठेवल्या जात आहे,तसेच नप तील कामचोर कर्मचारी या कडे लक्ष देत नाही ज्यामुळे येथील नागरिकांना एक हंडा भर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे,व हंडा भर पाणी विकत घ्यावे लागत आहे ज्यामुळे येथील नागरिकांना शारिरिक,मानसिक,आर्थिक त्रास या कामचोर अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे सहन करावा लागत आहे,तसेच वार्डातील नगरसेवकाना या होणाऱ्या समस्या कडे कधी लक्ष देतील अशी ही चर्चा नागरिक करत आहे निवडणूक झाल्या पासून दोघेही नगरसेवक वार्डात दिसलं नाही! सध्या उन्हाळा सुरू असलयामुळे पाणीची आवश्यकता जास्त प्रमाणात असते पण नप पाणी पुरवठा अधिकारी या कडे लक्ष देत नाही या पाणी सोडणारे कर्मचाऱ्यांना जर या बद्दल गल्लीतल्या लोकांनी फोन लावला तर ते ही उडवाउडवीचे उत्तरे देत आहे,काजी मोहल्ला परिसरातील टेकडा हा परिसर उच्च ठिकाणी असल्याचे कारण पुढे करून पाणी पुरवठा अधिकारी वेळ काडू पणा करीत आहेत याच परिसराला लागून बरेच मोहल्ले उच्च ठिकाणी आहेत येथे मुबलक पाणी पुरवठा नप द्ववरा करण्यात येत आहे काजी मोहल्ला प्रत्येक वेळी कोरडाच का?हा परिसर संपूर्ण अल्पसंख्याक असल्याने नप द्ववरा पाणी पुरवठा करण्यात दुजाभाव का? असे ही प्रशन येथिल नागरिक नगर परिषद भोकरदन कडून विचारत आहे,तसेच संबंधीत पाणी पुरवठा अधिकारी यांची बद्दली करून काजी मोहल्ल्याततील पाणी पुरवठा सुरळीत करून द्यावी अशी मांग येथील त्रस्त नागरिक नगर परिषद भोकरदन कडून करीत आहे व येथील नागरिक नप भोकरदन च्या विरोधात मोठ्या आंदोलन च्या पवित्रता आहे,
काजी मोहल्ला येथे नळाला पाणी येत नाही जर कधी आला तर फक्त 5 मिंट साठी येते ते ही कमी दाबाने,आमचा परिसर उच्च ठिकाणी असल्याने नळाला पाणी येतच नाही,,तरी नप ने तात्काळ पाणी पुरवठा करावा,खालिद शेख,,नागरिक,काजी मोहल्ला भोकरदन
काजी मोहल्ला येथील टेकडा परिसरात गेल्या महिन्या पासून नप द्ववरा पाणी पुरवठा केला गेला नाही ज्यामुळं आम्हाला पिण्याचे पाणी अव्वाच्या सव्वा दराने विकत घ्यावे लागत आहे,नप ने या होणाऱ्या समस्या कडे लक्ष देऊन वार्डात पाणी पुरवठा करावा,,शेख तौसिफ, नागरिक काजी मोहल्ला भोकरदन
0 Comments