भोकरदन मध्ये दारू पिऊन वाहन चालवणार्यांची संख्येत वाढ.मोठी हानी होण्याची शक्यता.
भोकरदन मध्ये दारू पिऊन वाहन चालवणार्यांची संख्येत वाढ.मोठी हानी होण्याची शक्यता.
महेबुब भारती भोकरदन
दारू पिऊन वाहन चालवणे कायदेशीर गुन्हा आहे अश्या वक्ती विरुद्ध हिट अॅड रनचा गुन्हा दाखल होऊन खटला चालवून दंड शिक्षा अथधा दोन्ही पात्र आहे या संदर्भात वाहतुकीचे नियम या विषय गंभीर करण्यात आले आहे असे असले तरी भोकरदन मध्ये या नियमाचा मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे दारू पिऊन वाहन चालका कडून अनेक जीवघेने अपघात देखील घडून आल्याचे चित्र आहे मात्र या गंभीर प्रकाराकडे पोलिस प्रशासन मूकबधिरची भुमिकेत आढळून आली आहे शहरात या विषय संबंधित प्रशासनाकडुन कसलीही जन जागृती आज पर्यंत करण्यात आली नसल्याचा आरोप तालुक्यातील नागरीकांनी संताप वक्त करून सांगितले आहे शहरात मद्यधुंद अवस्थेत अनेक जन आढळून आले याची माहीती देखील पोलीस प्रशासनाला असुन सुद्धा कारवाई होत नसल्यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे त्याचबरोबर एखादी गोर गरीब वक्ती या विषय पोलीसांच्या सापळ्यात सापडून आल्यावर त्याला खाकीचा धाक आणी ओळखीच्या कडून वर हात काही असाच चित्र भोकरदन शहरात घडून येत आहे हे विषेश तळीराम स्वता शुद्धीत नाही तर ते दुसर्याचे जीव धोक्यात घालून बिनधास्त आपली वाहन चालवताना अनेकवेळा आढळून आले असे असले तरी पोलीस प्रशासन अशा वक्ती विरोधात मोहीम का राबवित नाही असा सवाल ही सामान्य नागरिकांना पडत आहे शहरात या संदर्भात तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे महत्वाचे म्हणजे मद्यधुंद दारूच्या नशेत वाहन चालवून तळीराम समोरच्या वाहनाला मागून घडकत आहे आणी धिंगाणा घालत समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अनेक सहकार्याचा मदतीने जास्त पैश्याची मागणी करीत असल्याचे बोललेजात आहे या सर्व बाबी पोलीसांना माहीत आहे मात्र ओळखीमुळे पोलीस प्रशासन पुढील कार्यवाही करीत नसल्याचा देखील आरोप करण्यात येत आहे तरी या विषय शहरात वाहन तपासणी मोहीम राबविण्यात यावी आणी दारू पिऊन वाहन चालवताना आढळून आले तर योग्य रित्या कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
दारूड्या वाहन चालकाकडून मोठा अपघात घडून येण्याची शक्यता.
दारू पिऊन चार चाकी दुचाकी वाहने सर्रास चालवली जात आहे कारण शहरात खाकीचा धाक दाखील शिल्लक राहीला नसल्यामुळे या लोकांनी भर चौकात व नागरी वस्ती मध्ये मोठा धिंगाणा माडून ठेवला आहे दारू पिऊन दुसर्याचे जीवाची कसलीही पर्वा न करता खुलेआम बिनधास्त मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविली जात आहे ज्यामुळे मोठी हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही या विषय वरीष्ठ अधिकार्यांनी लक्ष केंद्रित करून अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी विविध समाजिक कार्यकर्ते कडून करण्यात येत आहे .
0 Comments