वंचित"चा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा"|"वंचित"चा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा"
केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करा!"वंचित"चा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा"
भोकरदन दस्तक ब्युरो
भोकरदन:केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी कायद्या विरोधात दिल्लीत मागील तीन महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी भोकरदन च्या वतीने भोकरदन येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली.
शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली येथे मागील तीन ते साडे तीन महिन्यापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत.परंतु केंद्र सरकारने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.त्यामुळे सरकारने शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव अड.हर्षवर्धन प्रधान,अमोल साळवे, सुभाष सुरडकर, विशाल मिसाळ,सुनील जोगदंडे,अरुण राऊत, सुशील जोगदंडे,राजू जोगदंडे,राहूल जोगदंडे,कौतीक जोगदंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments