डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा व मस्जिद जवळील देशी दारूचे दुकान हटवा नसता आमरण उपोषण!

by - 19:37

डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा व मस्जिद जवळील देशी दारूचे दुकान हटवा नसता आमरण उपोषण!
भोकरदन दस्तक संपादक महेबूब भारती

भारतीय बौध्द महासभा,बौध्द व मुस्लीम समाज तसेच त्रस्त नागरीकांनी निवेदनाद्वारे दिला नगर परिषद प्रशासनाला इशारा"
भोकरदन:शहरातील सिल्लोड कॉर्नर वरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच मस्जिद जवळ असलेले देशी दारूचे दुकान त्वरित हटवावे नसता आगामी 16 मार्च पासून नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा बौद्ध, मुस्लिम बांधव व भारतीय बौद्ध महासभा आणि परिसरातील त्रस्त नागरिकांनी शुक्रवारी 5 मार्च रोजी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने नगर अभियंता किशोर ढेपले यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
 दरम्यान, तत्पूर्वी नवे भोकरदन भागातील रमाई नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पूज्य भदंत यांच्या नेतृत्वाखाली तोंडाला मास्क लावून अंत्यत शिस्तबद्धपणे सर्वजण नगर परिषद समोर आले. व याठिकाणी भदंत तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच त्रस्त रहिवाशांनी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख व किशोर ढेपले यांना निवेदन दिले.
 याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यापूर्वी ही विविध सामाजिक संघटना,पक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदन देऊन सदरील देशी दारूचे दुकान हटविण्याची मागणी केली आहे.तसेच नगर परिषद मध्ये सर्वसाधारण सभेत ही दुकान हटविण्यासंबधी ठराव मंजूर करण्यात आलेला आहे.विशेष म्हणजे मुख्याधिकार्यांनी दुकान हटविण्याची नोटीस देऊनही अद्याप दुकान हटविण्यात आले नाही.तसेच सदरील जागा क्रमांक 63 ही भाडे तत्वावर नोंदी नुसार जागा भाडे रजिस्टर ला आज रोजी किशोरलाल पितांबरलाल जैस्वाल रा औरंगाबाद यांचे नाव नोंद असून संबंधीताने देशी दारूचे दुकान इतर इसमास हस्तांतरित केले आहे.

You May Also Like

0 Comments