भोकरदनमध्ये शोरुमचा स्टोअर किपरच निघाला चोरटा

by - 09:15

भोकरदनमध्ये शोरूमचा स्टोअर किपरच निकाला चोरटा


भोकरदन (अनिस भारती ) : येथील भोकरदन-सिल्लोड रस्त्यावरील एका दुचाकी शोरूम मधून १८ आॅक्टोबर रोजी ३ लाख २३ हजार रूपये लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी रविवारी अटक केली. यात विशेष म्हणजे, शोरुममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच ही चोरी केली. रमेश नायबराव सहाणे (२६) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून २ लाख ५० हजार रक्कम हस्तगत करण्यात आली.

येथील व्यापारी प्रतिक देशमुख यांचे भोकरदन - सिल्लोड रस्त्यावर एका कंपनीचे शोरुम आहेत. १८ आॅक्टोबरला दसरा असल्याने त्यादिवशी वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. वाहनांच्या विक्रीतून त्यांना ३ लाख २३ हजार रूपये मिळाले.  त्यांनी हे पैसे शोरुम मधील लॅकरमध्येच ठेवून ते शार्टर बंद करुन निघून गेले. याच संधीचा फायदा घेत, शोरुम मधील कर्मचारी रमेश सहाणे यानी चोरी करुन शोरुमधून २ लाख ९८ हजार रूपये व लॅपटॉप हिशोबाचे पुस्तक चोरली.

 याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये, पोनि. दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी पाहणी करून आरोपीला पकडण्यासाठी पथक तयार करून तपासाची चक्र फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे रमेश सहाणे (शोरूम स्टोअर किपर) याला रविवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये हस्त गत करण्यात आले असून, पुढील तपास पोउपनि. वैशाली पवार करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी. दशरथ चौथरी, पोउपनि. ज्ञानेश्वर साखळे, दत्तात्रय कोनार्डे, रामेश्वर सिनकर, गणेश पायघन, सागर देवकर, जगदीश बावणे, रूस्तुम जेवाळ, अभिजीत वायकोस, विजय जाधव आदींनी केली.

You May Also Like

0 Comments