Powered by Blogger.

BHOKARDAN DASTAK

नूर सोशल ग्रूपचे रास्ता रोको आंदोलन आणी निवेदन ची दखल घेवून भोकरदन शहरातील सिल्लोड रोड वरील मिर्ची घेणाऱ्या व्यापा-यांना इतर ठिकाणी हलवण्यात आले.







भोकरदन नगरपरिषद च्या मुख्याधिकारी याना नूर सोशल ग्रूप च्या वतीने दिनांक ३० जुलई २०२० या तारखेला मिरची खरीदी संबधी निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले होते की भोकरदन शहरातील मिर्ची व्यापारी सिल्लोड रोड वर मिर्ची खरीदी करत असून तसेच सदर परिसर शहराच्या मध्ये भागी असून येथील दुकानदार,पायी चालणाऱ्या,दुचाकी स्वारांना व येथील रहिवासीयांच्या डोळ्यात मिरचीचे धूळ जात आहे त्यामुळे डोळ्याचे व फुफुसाचे मोठे आजार ही होवू शकते, तसेच येथील ये-जा करणाऱ्या लोकांना व परिसरातील दुकानदारांना याचा फार त्रास सहन करावा लागत होता . विशेष म्हणजे मिर्ची व्यापारी बिनकामी मिर्ची रोड वर फेकून देत असल्याने मिर्ची चा ठसका सपूर्ण परिसरात पसरत असल्याने येथून येजा करणाऱ्याना व येथील दुकानदाराना दुकानात बसने फार कठीण झाले होते, व तसेच येथील मिर्ची व्यापरियाना तात्काळ येथून हलविण्यात यावा व शहरातील नागरिकांना व वाहनधारकांना दुकानदारांना या त्रासापासून मुक्त करावे, या त्रासा बद्दल नगर परीषद भोकरदनला निवेदन देण्यात आले होते.या निवेदनात नूर सोशाल ग्रूप या सामाजिक संघटनेने मांग केली तसेच नूर सोशल ग्रुप चा वतीने तिव्र आंदोलन छेडण्याच्या इशारा हि देण्यात आला होता. तसेच या संबंधी बातमी सर्व प्रमुख वृत्तपत्रात आली होती. या निवेदनाची आणी रास्ता रोको आंदोलन चा इशारा देताच,नगर परिषद ने दखल घेवून भोकरदन शहरातील सिल्लोड रोड वरील मिर्ची घेणाऱ्या व्यापा-यांना सिनेमा गृह जवळ या ठिकाणी हलवण्यात आले. सिल्लोड रोड वरील दुकानदार ,व्यापारी वर्ग,पायी चालणारे लोक महेबूब भारती यांचा कोतुक करीत आहे तर महेबूब भारती यांनी मुख्याधिकारी नगर परिषद भोकरदन यांचा आभार माणला आहे .


नूर सोशल ग्रूपचे रास्ता रोको आंदोलन आणी निवेदन ची दखल घेवून भोकरदन नप ने भोकरदन शहरातील सिल्लोड रोड वरील मिर्ची घेणाऱ्या व्यापा-यांना सिनेमा गृह जवळ या ठिकाणी हलविले व  येथील दुकानदार,पायी चालणाऱ्या,दुचाकी स्वारांना व येथील रहिवासीयांच्या डोळ्यात मिरचीचे धूळ जात होते त्यामुळे डोळ्याचे व फुफुसाचे मोठे आजार ही होवू शकते, तसेच येथील ये-जा करणाऱ्या लोकांना व परिसरातील दुकानदारांना याचा फार त्रास सहन करावा लागत होता .येथील दुकानदाराना दुकानात बसने फार कठीण झाले होते,व शहरातील नागरिकांना  व वाहनधारकांना दुकानदारांना या त्रासापासून मुक्त करावे, या त्रासा बद्दल नगर परीषद भोकरदनला निवेदन देण्यात आले होते. नूर सोशाल ग्रूपच्या  वतीने आम्ही मांग केली होती ते पुर्ण झाली मी नूर सोशल ग्रुप चा अध्यक्ष होण्याचा नात्याने नप मुख्य अधिकारी तसेच प्रशासनाचया आभार व्यक्त करतो ....

महेबुब भारती 
अध्यक्ष नुर सोशल ग्रुप,भोकरदन
Share
Tweet
Pin
Share
No Comments

भोकरदन शहरातील सिल्लोड रोड वरील मिर्ची घेणाऱ्या व्यापा-यांना इतर ठिकाणी हलवा
सोशल डिस्टन्स  चा पालन न करणाऱ्या वर कडक कारवाई करा –महेबूब भारती



भोकरदन नगरपरिषद च्या मुख्याधिकारी याना नूर सोशल ग्रूप च्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की भोकरदन शहरातील मिर्ची व्यापारी सिल्लोड रोड वर मिर्ची खरीदी करत  असून तसेच सदर परिसर शहराच्या मध्ये भागी असून येथील दुकानदार,पायी चालणाऱ्या,दुचाकी स्वारांना व येथील रहिवासीयांच्या डोळ्यात मिरचीचे धूळ जात आहे त्यामुळे डोळ्याचे व फुफुसाचे मोठे आजार ही होवू शकते, तसेच येथील ये-जा करणाऱ्या लोकांना व परिसरातील दुकानदारांना याचा फार त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे मिर्ची व्यापारी बिनकामी मिर्ची रोड वर फेकून देत असल्याने मिर्ची चा ठसका सपूर्ण परिसरात पसरत असल्याने येथून येजा करणाऱ्याना व येथील दुकानदाराना दुकानात बसने फार कठीण झाले आहे,तसेच मिर्ची व्यापारी तासंतास मिर्ची च्या भरलेल्या जड वाहने रोड वर उभे करून देत आहे ज्यामुळे या रोड वर ट्राफिक चा ही प्रशन निर्माण झाला आहे, तसेच सध्या कोरोना वायरस देशात व शहरात पसरत असून सिल्लोड रोड वर सोशल  डिस्टन्स, चा ही फज्जा उडत आहे,व कोरोना पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे,तसेच सांबांधित व्यापाऱ्यां विरोधात कोरोना  प्रतिबंध कायद्या चा खाली गुन्हा दाखल करावा,व तसेच येथील मिर्ची व्यापरियाना तात्काळ येथून हलविण्यात यावा  व शहरातील नागरिकांना  व वाहनधारकांना दुकानदारांना या त्रासापासून मुक्त करावे,अन्यथा नूर सोशल ग्रुप चा वतीने तिव्र आंदोलन छेडण्याच्या इशारा महेबूब भारती यांनी निवेदनात दिला आहे . यावेळी नूर ग्रूप चे अध्यक्ष महेबूब भारती,जाकेर खान,एम ए अजीज, समाधान तडेकर,शिव शिवराम शेवाडे,अनिल पाटील,पठाण सलमान खान,जलील शेख,सतीश सुरकडकर,रामदास देवराव रोडे,वसीम शेख,वाहन चालक,शेख मोहसीन,शेख अमीन इत्यादी उपस्थीत होते.

Share
Tweet
Pin
Share
No Comments

सलग तीस वर्षापासून करतात सर्जेराव रजाळे रमजानचे उपवास.



भोकरदन/प्रतिनिधि
तालुक्यातील सोयगाव देवी येथील 61 वर्षीय होमगार्ड सर्जेराव रजाळे हे गेल्या तीस वर्षापासून सलग आज पर्यंत मुस्लिम धर्मियांच्या रमजानचे उपवास म्हणजे रोजा करतात विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या कालखंडात त्यांच्या उपवासात आज पर्यंत एक दिवसही खंड पडलेला नाही.

ये भी पढ़े :-संयुक्त अरब अमीरात ने अंध भक्तों के मुंह पर तमाचा मारते हुए भारत को 7 मीट्रिक टन मेडिकल सप्लाई कि मदद कि.

पेशाने शेतकरी असलेले सर्जेराव राजाळे हे होमगार्ड म्हणून काम करीत असताना त्यांनी तीस वर्षांपूर्वी या रमजानच्या रोजा उपवासाला सुरुवात केली ती आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे विशेष म्हणजे एवढ्या उन्हामध्ये ही शेतातील सर्व कामे करून तेया उपवासाचे नियम पाळतात याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की गेल्या तीस वर्षांत उपवासात एक दिवसही खंड पडलेला मला आठवत नाही मी वास काळातही नेहमीप्रमाणे शेतातील मेहनतीची कामे करतो मात्र कधीही थकवा जाणवला नाही आता घड्याळ मोबाईल असल्याने इफतहार म्हणजे उपवास सोडण्याची वेळ कळते मात्र पूर्वी शेतात काम करीत असताना आमच्या सोयगाव देवी येथील गावात मज्जित नव्हती त्यामुळे शेजारील कुंभारी येथील गावातील मशिदीवरील भोंग्या च्या आवाजात उठून सकाळी सहेरी करून उपवास सुरू करावा लागे व सायंकाळी याच भोंग्याचा आवाजावरून इफत्तहार म्हणजे उपवास सोडावा लागत असे


ये भी पढ़े :-देश का खज़ाना लूटने वाले 50 भगौड़ों में  मोदी के दोस्त शामिल है 

मात्र आता सर्व साधने उपलब्ध असल्याने वेळेचे बंधन पाळणे सोपे झाले आहे सुरुवातीला रोजा हा काय प्रकार असतो म्हणून सुरू केलेली उपवास आता अंगवळणी पडलेले असून ते उपवास केल्याशिवाय करमत नाही विशेष म्हणजे या काळात कितीही मेहनतीची कामे केली तरी थकवा न येता प्रसन्नता वाटते हे विशेष आहे.

ये भी पढ़े :- मैं हिंदू हूं और बीफ़ खाता हूं ऋषि कपूर,इस कारण याद किये जा रहे है - ऋषि कपूर
Share
Tweet
Pin
Share
No Comments

भोकरदन मध्ये हिंदु, मुस्लिम बांधवांनी विराट जन आक्रोश मोर्चा काढुन दिले धरणे,

#CAB.NRC.चा विरोधात आंदोलन
* शहरातील व्यापाऱ्यांनी आपपाल्य प्रतिष्ठान बंद ठेवले,








भोकरदन प्रतिनिधी/
CAA, NRC रद्द करो कला कानून रद्द करो,छिन्न के लेंगे आझादी,अश्फाक वाली,आझादी,आंबेडकर वाली आझादी,अशा घोषणा देत सोमवारी सकाळी 10 वाजता आक्रोश मोर्चा ची सुरुवात मर्कज मस्जिद काजी मोहल्ला येथून विराट मोर्चा काढुन तहसील कार्यालय समोर,धरणे दिले या वेळीCAA, NRC चा काळ्या कायदे चा बाबत,हाफिज शाफिक,शब्बीर कुरेशी माजी,आमदार,चंद्रकांत दानवे,शफीख पठाण,पाबळे आण्णा, ऍड,जाधव,नारायण जीवरग,मनीष भय्या, भूषण शर्मा, (समाज सेवक)अज्जूभाई,नसीम पठाण, नूर सोशल ग्रुप अध्यक्ष,महेबूब भरती,सुरेश ताडेकर,प्रदीप जोगदंड, सिद्दीक अब्दुल कुददुस, आदी मान्यवरांच्या भाषणे झाली,व,जमिया विद्यापीठ, जे एन यु,ए एम यु,आदी विद्यापीठ मध्ये झालेल्या विद्यार्थ्यांनावर अमानुष् लाठी चर्चा चा निषेध करण्यात आलं,या वेळी,हजारोंच्या संख्येने हिंदु,मुस्लिम समाज बांधवांनी आपली उपस्थिती नोंदवली होती,
या विषय सविस्तर वृत्त असे की नुकतेच केंद्र सरकारने नागरीक संशोधन विधेयक बिल पास केल्यामुळे सोमवारी सकाळी भोकरदन येथील सकल मुस्लिम समाज तर्फे विराट मोर्चा काढुन सरकारच्या या निर्णयाचा जोरदार विरोध केला सदरील मोर्चेला सुरूवात शहरातील मर्कज मस्जिद परीसर येथुन काढण्या आले तसेच पोलीस ठाणे डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौक टिपू सुलतान चौक,येथुन तहसील कार्यालयवर धडकुन कार्यालय समोर धरणे दिले तसेच सदरील बिल हा मान्य नाही ते तात्काळ रद्द करा असे तहसीलदार यांच्या मार्फत भारता चे राष्ट्रपती यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे तसेच सरकार विरोधात घोषना देत जोरदार शक्ती प्रदर्शन केला मोर्चेत हजारोच्या संख्येने शहरातील हिंदू, मुस्लिम बांधव,व्यापारी सर्व पक्षा चे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर या मोर्चेत सहभागी झाले होते दरम्यान भारतीय संविधान कलम १४.१५.नुसार सर्व भारतीय नागरीक कायद्या पुढे समान आहे देशातील,सर्व जातीच्या लोकांचे जाती अथवा धर्माच्या प्रति भेदभाव करण्या पासुन कायद्याचे बंधन आहे तसेच असे करणे गैर कायदेशीर व कायदेचा उल्लंघन आहे असा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे तसेच राष्टपती महोदय यांनी या कानुन विषय गंभीरता दाखवुन नागरीकावरील होणार्या अन्याय थांबावा तसेच,दिलेल्या निवेदनात शेवटी नमुद आहे निवेदनावर हाफीज शफीक,शाफिक पठण शब्बीर कुरेशी, नसीम पठाण,महेबूब भारती, कादिर बापू,एजाज पठाण, मनीष श्रीवास्तव, सुरेश ताडेकर, नारायण जीवरग, कुददुस सर,पाबडे अण्णा,संग्राम सर,महेश पुरोहित, रिजवन भाई, जाकेर खान,नाजीर भाई, श्रावण कुमार अकसे, यांच्या सह हजारोच्या स्वाक्षर्या आहे,व बिल च्या विरोधात हजारो च्या संख्येने हिंदू मुस्लिम समाजातील व राजकीय सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते,या मोर्चाला मराठा सेवा संघ,
इंद्रा कांग्रेस, नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी,ncp, शिव सेना,व्यापारी संघ, भारिप बहुजन पक्ष,मराठा क्रांती मोर्चा,संभाजी ब्रिगेड,छावा संघटना, नूर सोशल ग्रुप, भीम आर्मी,भोकरदन आदी संघटने ने जाहीर पाठिंबा दिला,
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरातील, शाफिक सेठ मित्र मंडळ,नूर सोशल ग्रुप,,लबबईक,ग्रूप,तसेच सकल मुस्लिम समाजातील युवकांनी आदी ने परिश्रम घेतले,



Share
Tweet
Pin
Share
No Comments

भोकरदन मध्ये मुस्लिम बांधवांनी विराट मोर्चा काढुन दिले धरणे,

#CAB.NRC.चा विरोधात आंदोलन |सरकार विरोधात घोषना

भोकरदन प्रतिनिधी 
नही चलेगी नही चलेगी सरकार की ताना शाही नही चलेगी अशा घोषणा देत शुक्रवारी दुपारी नमाजे जुमा नंतर विराट मोर्चा काढुन उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर जमियत उलेमा हिंद च्या वतीने धरणे दिले या वेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधवांनी आपली उपस्थिती नोंदवली होती,

भोकरदन की वीडियो देखने केलिए यहाँ क्लिक करे 

या विषय सविस्तर वृत्त असे की नुकतेच केंद्र सरकारने नागरीक संशोधन विधेयक बिल पास केल्यामुळे शुक्रवारी दुपारी भोकरदन जमेतिया उलेमा हिंद तर्फे विराट मोर्चा काढुन सरकारच्या या निर्णयाचा जोरदार विरोध केला सदरील मोर्चेला सुरूवात शहरातील मर्कज मस्जिद परीसर येथुन काढण्या आले तसेच पोलीस ठाणे डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौक येथुन उपविभागीय अधिकारी कार्यालयवर धडकुन कार्यालय समोर धरणे दिले तसेच सदरील बिल हा मान्य नाही ते तात्काळ रद्द करा असे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे तसेच सरकार विरोधात घोषना देत जोरदार शक्ती प्रदर्शन केला मोर्चेत हजारोच्या संख्येने शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर या मोर्चेत सहभागी झाले होते दरम्यान भारतीय संविधान कलम १४.१५.नुसार सर्व भारतीय नागरीक कायद्या पुढे समान आहे राज्याला सर्व जातीच्या लोकांचे जाती अथवा धर्माच्या प्रति भेदभाव करण्या पासुन कायद्याचे बंधन आहे तसेच असे करणे गैर कायदेशीर व कायदेचा उल्लंघन आहे.

जमीयत उलेमा ए  हिन्द भोकरदन की वीडियो देखने केलिए यहाँ क्लिक करे 

 
असा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे तसेच राष्टपती महोदय यांनी या कानुन विषय गंभीरता दाखवुन नागरीकावरील होणार्या अन्याय थांबावा असे दिलेल्या निवेदनात शेवटी नमुद आहे निवेदनावर हाफीज शफीक, हाफीज हारुण,इम्रान मौलाना नदवी,मौलाना फेरोज,हाफीज जावेद,मुफ्ती खालीद, हाफीज अनसार, मौलाना जमील, हाफीज अब्दुल मजीद,मौलाना, कुद्दुस,सर, इम्रान, मौलाना मुजीब, मौलाना अब्दुल रहेमान,महेबूब भारती, शब्बीर कुरेशी, नगरसेवक कादिर शेख,नसीम शेख, सलमान खान,जाकेर खान,नाजीर भाई,अनिस भारती, वसीम शेख,श्रावण कुमार अकसे, अझर पठाण,नसीम पठण,अस्लम पठाण,नसीम कुरेशी,रिझवान भाई,यांच्या सह हजारोच्या स्वाक्षर्या आहे,व बिल च्या विरोधात हजारो च्या संख्येने हिंदू मुस्लिम समाजातील व राजकीय सामाजिक, शैक्षणिक समाजातील नागरिक उपस्थित होते,



Share
Tweet
Pin
Share
No Comments

अलहुदा उर्दु शाळेचा देशप्रेमावर आधारित झालेला कार्यक्रम कौतुस्पद



भोकरदन येथील अलफलाह एज्युकेशनल अॅन्ड वेलफेअर सोसायटी भोकरदन व्दारे संचलित अलहुदा उर्दु विघालय भोकरदन या शाळेचे देशाप्रेमावर आधारित कार्यक्रमात शाळेतिल मुला मुलींनी मिल्ट्री फोर्स आणी महाराष्ट्रा पोलीस दल व आतंकवाद यांचा वेशभुषा प्ररिधान करुन अलहुदा अर्दु विघालय,भोकरदन पोलीस ठाणे व शिवाजी चौकात स्वतंत्र्य दिवसा निमित्ताने देशभक्ती कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या वेळी संस्थेचे चे अध्यक्ष शब्बीर कुरेशी यानी कार्यक्रम तयार करणारे शिक्षकांना बक्षीस दिले.


संस्थेचे अध्यक्ष शब्बीर कुरेशी यांचे हस्ते सकाळी 7:35 वाजता झंडा वंदन झाला या वेळी भोकरदन शहरातील विघार्थी व गावातील प्रतिष्टीत नागरीक उपस्थित होते.

ये देखा आपने :हिन्दू बाबाने पैशांच्या पावसाचं आमीष दाखवुन महिलेवर केला बलात्कार भोंदूबाबाला अटक

 यावेळी शिवाजी चौक भोकरदन येथे शाळेचे वतीने कार्यक्रमात भोकरदन जाफ्राबाद तालुक्याचे आमदार संतोष रावसाहेब दानवे, पोलिस उपविभागीय अधिकारी सुनिल जायभाय,पी.आय.दशरथ चौधरी,शफिक पठाण,मुकेश चिने, श्रावन कुमार आक्से, हाजी मुजिब,व नगर सेवक प्रतिष्ठित नागरीक उपपस्थित होते.यावेळी संस्थेचे सचिव गुलाब खान, मुख्याध्यापक कामिल पटेल,प्राचार्य युनुस खान, अ.कुद्दुस, शे.बुठण,फजलुर्रहमान,मकसुद एकबाल,अय्युब खान,समद कुरेशी,साबिर खान शे.मुज़म्मील उपस्थित होते.शेवट सचिव यांना सर्वांचे आभार व्यक्त केले.सुत्र संचालन अय्युब खान यांनी केले.

ये देखा आपने : 1 ली क्लास से 10 वी क्लास तक की किताबे कैसे डाउनलोड करे

Share
Tweet
Pin
Share
No Comments

भोकरदन येथे टिपू सुल्तान जयंती जल्लोशात साजरी,


 भोकरदन शहरात दरवर्षी परमाने या वर्षीही शहरातील नुर सोशल ग्रुप च्या वतीने राजे टिपू सुल्तान जयंती नीमत्त शहरातून गजवजा सह भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक ची सुरवात सकाळी काजी मोहल्ला,येथून सुरूवात झाली. मिरवणुक पोलिस ठाणे परिसर, अम्बेडकर चौक,शिवजी चौक, आदि परिसरा मार्गाने भोकरदन येथील टिपु सुल्तान चौका पर्यंत नागारे ढोल ताशाच्या गजरात वाजतगाजत मिरवणुक काढण्यात आली.




 या वेळी महेबुब भरती यांनी टिपू सुलतान यांचा जीवनावर प्रकाश झोत टाकणारी भाषण केली.भोकरदन,पोलिस ठाणे चे पो,उप,नि,,नयनेश्वर साखरे यानी टीपु सुल्तान चौक येथे टिपू सुल्तान प्रतिमेस हार अर्पण केले तसेच साखरे साहेब,यांच्या सत्कार ग्रुप चा वतीने करन्यात अला, कार्यक्रमास नूर सोशल ग्रुप चे अध्यक्ष महेबुब भरती, फहीम पेंटर ,डॉ,शेख यूसूफ, जाकेर खान, अनील पगारे, आमिन , रणवीर राजपुत,शेख फारुख ,,धीरज वाघ,,शेख नदीम,सुनील गायकवाड, अनीस भरती, मुकेश वाघ ,एम.ए.अजीस, आसिफ खान,नाजेम कुरेशी,शेख समीर,शेख वासिम,शेख समी,शेख शाहिद,रमेशवर वाघ , इश्शु खान,शरेक खान,शेख सदेक ,सय्यद मुकीद,शेख अफसर,नासेर पठाण, अन्सार खान,शेख मुस्ताक,मुकिम खान, तसेच टिपू सुलतान प्रेमीं मोठ्य संख्यात उपस्थिती होते या वेळी भोकरदन पोलिस ठाणेन्या च्या वतीने पोलिस बंदोबस्त करण्यात अला होता
























Share
Tweet
Pin
Share
No Comments

भोकरदनमध्ये शोरूमचा स्टोअर किपरच निकाला चोरटा


भोकरदन (अनिस भारती ) : येथील भोकरदन-सिल्लोड रस्त्यावरील एका दुचाकी शोरूम मधून १८ आॅक्टोबर रोजी ३ लाख २३ हजार रूपये लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी रविवारी अटक केली. यात विशेष म्हणजे, शोरुममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच ही चोरी केली. रमेश नायबराव सहाणे (२६) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून २ लाख ५० हजार रक्कम हस्तगत करण्यात आली.

येथील व्यापारी प्रतिक देशमुख यांचे भोकरदन - सिल्लोड रस्त्यावर एका कंपनीचे शोरुम आहेत. १८ आॅक्टोबरला दसरा असल्याने त्यादिवशी वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. वाहनांच्या विक्रीतून त्यांना ३ लाख २३ हजार रूपये मिळाले.  त्यांनी हे पैसे शोरुम मधील लॅकरमध्येच ठेवून ते शार्टर बंद करुन निघून गेले. याच संधीचा फायदा घेत, शोरुम मधील कर्मचारी रमेश सहाणे यानी चोरी करुन शोरुमधून २ लाख ९८ हजार रूपये व लॅपटॉप हिशोबाचे पुस्तक चोरली.

 याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये, पोनि. दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी पाहणी करून आरोपीला पकडण्यासाठी पथक तयार करून तपासाची चक्र फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे रमेश सहाणे (शोरूम स्टोअर किपर) याला रविवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये हस्त गत करण्यात आले असून, पुढील तपास पोउपनि. वैशाली पवार करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी. दशरथ चौथरी, पोउपनि. ज्ञानेश्वर साखळे, दत्तात्रय कोनार्डे, रामेश्वर सिनकर, गणेश पायघन, सागर देवकर, जगदीश बावणे, रूस्तुम जेवाळ, अभिजीत वायकोस, विजय जाधव आदींनी केली.
Share
Tweet
Pin
Share
No Comments

भोकरदन येथे नॅशनल शाळेतील  विद्यार्थ्यांची  पावसा साठी दुवा,


पावसासाठी दुवा करतांना शाळेतील विद्यार्थी


(भोकरदन प्रतिनिधी)
वरून राजा आपल्या भागात रूसला असुन तालुक्यात मुसळधार पाऊस पडावा म्हणून सर्व समाजाकडुन इश्वर अल्लाह कडे साकडे घालतात आले त्यातुनच शहरातील नॅशनल उर्दू शाळेतील वर्ग पहिली ते दहावीच्या विद्यार्थीने चांगला पाऊस पडावा म्हणून विषेश दुवाचे आयोजन करण्यात आले होते.

क्या आपने ये पढ़ा : अपने मोबाइल से इलेक्शन  कार्ड कैसे बनाये. 

विषेश म्हणजे तालुक्यात कमी पावसामुळे अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली असुन शेत मालाला पण मोठा फटका बसला असुन शेतकरी वर्ग चिंतातुर झाला यंदा पाऊस गायब झाल्याने अनेक धरणे कोरडे तर विहीरींनी तळ गाठले शहरासह तालुक्यातील अनेक भागात टॅकरने पाणीपुरवठा करण्याची दुर्दैव बाब आहे आपले तालुक्यात चागला पाऊस पडावा या साठी शहरातील नॅशनल उर्दू शाळेतील विद्यार्थीने डोळ्यात पाणी अल्लाह तु सर्वश्रेष्ठ आहे आम्ही तुझ्या पुढे काहीच नाही मुक्या जनावरांना पाणी नाही शेतकरी हवालदिल झाले सर्वदूर पाण्या साठी भटकंती अल्लाह तु आपले कृपेने तालुक्यात जोरदार पाऊस दे अशी या वेळी नॅशनल शालेय विद्यार्थीनी शुक्रवारी विषेश नमाज नंतर अल्लाह कडे दुवा मागीतली या वेळी शाळेचे मुख्याध्यापक शे.इरफान शेख वाजीद ,प्रभारी अनीस खान , शिक्षक बशीर मुलतानी ,सय्यद यूसुफ , शेख जाफर , शेख नईम , शेख इद्रीस , शेख जाफर , अबरार देशमुख ,मुख्तार क़ूरेशी , पठान अनसार , अलजिलानी साद ,पठान इमरान ,शेख खालेद ,सय्यद रुखसार ,खान शबाना , सालेहा अंजूम ,शेख शहज़िया ,शेख जमील व शेख जूबेर , शमीम सिद्दीकी उपस्थित होते दरम्यान संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान रे पिंपळगाव पारध आदी भागात पाऊसाने हजेरी लावली होती
======================================================================================================================================

                                 तुम्ही हे बघितला का ?



VOTER LIST 2019 VOTER LIST PUBLISHED BY ELECTION COMMISSION OF INDIA

⇒Hello dosto aaj ki post me hum aapko batane wale hai ki election commission of India ne election 2019 ki yaadi ( list ) Ko published kardiya hai. aaj hum aapko batane wale hai ki is yaadi me aapko apna Naam kaise search karenge to dosto is post Ko PURA padhe take aapko aasani se ye samajh sake.Chalye shuru karte hai.
bulandinsaf.com


Share
Tweet
Pin
Share
No Comments
Older Posts

About me

Follow Us

  • facebook
  • twitter
  • instagram
  • Google+
  • pinterest
  • youtube

Categories

recent posts

Sponsor

Facebook

Created with by ThemeXpose