सलग तीस वर्षापासून करतात सर्जेराव रजाळे रमजानचे उपवास.

by - 09:30

सलग तीस वर्षापासून करतात सर्जेराव रजाळे रमजानचे उपवास.



भोकरदन/प्रतिनिधि
तालुक्यातील सोयगाव देवी येथील 61 वर्षीय होमगार्ड सर्जेराव रजाळे हे गेल्या तीस वर्षापासून सलग आज पर्यंत मुस्लिम धर्मियांच्या रमजानचे उपवास म्हणजे रोजा करतात विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या कालखंडात त्यांच्या उपवासात आज पर्यंत एक दिवसही खंड पडलेला नाही.

पेशाने शेतकरी असलेले सर्जेराव राजाळे हे होमगार्ड म्हणून काम करीत असताना त्यांनी तीस वर्षांपूर्वी या रमजानच्या रोजा उपवासाला सुरुवात केली ती आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे विशेष म्हणजे एवढ्या उन्हामध्ये ही शेतातील सर्व कामे करून तेया उपवासाचे नियम पाळतात याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की गेल्या तीस वर्षांत उपवासात एक दिवसही खंड पडलेला मला आठवत नाही मी वास काळातही नेहमीप्रमाणे शेतातील मेहनतीची कामे करतो मात्र कधीही थकवा जाणवला नाही आता घड्याळ मोबाईल असल्याने इफतहार म्हणजे उपवास सोडण्याची वेळ कळते मात्र पूर्वी शेतात काम करीत असताना आमच्या सोयगाव देवी येथील गावात मज्जित नव्हती त्यामुळे शेजारील कुंभारी येथील गावातील मशिदीवरील भोंग्या च्या आवाजात उठून सकाळी सहेरी करून उपवास सुरू करावा लागे व सायंकाळी याच भोंग्याचा आवाजावरून इफत्तहार म्हणजे उपवास सोडावा लागत असे

मात्र आता सर्व साधने उपलब्ध असल्याने वेळेचे बंधन पाळणे सोपे झाले आहे सुरुवातीला रोजा हा काय प्रकार असतो म्हणून सुरू केलेली उपवास आता अंगवळणी पडलेले असून ते उपवास केल्याशिवाय करमत नाही विशेष म्हणजे या काळात कितीही मेहनतीची कामे केली तरी थकवा न येता प्रसन्नता वाटते हे विशेष आहे.

ये भी पढ़े :- मैं हिंदू हूं और बीफ़ खाता हूं ऋषि कपूर,इस कारण याद किये जा रहे है - ऋषि कपूर

You May Also Like

0 Comments