भोकरदन राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 143 वी जयंती साजरी

by - 19:30

भोकरदन  राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 143 वी जयंती साजरी


भोकरदन जि. जालना येथे डेबूजी युथ ब्रिगेड या संघटनेच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 143 वी जयंती शासकिय विश्रामगृह भोकरदन येथे साजरी करण्यात आली . डेबूजी युथ बिग्रेडचे जिल्हा मार्गदर्शक अॅड. एफ.एच. सिरसाठ यांनी गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून त्यांचे विचार प्रत्यक्षात आणण्याचे आवाहन केले. याच कार्यक्रमात पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धाजंली अर्पन करण्यात येवून सदर भ्याड हलल्याचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी डेबुजी युथ ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शुभम जाधव , तालुकाध्यक्ष गोपाल पैठणकर, विशाल पैठणकर, कैलास पैठणकर, गजानन पैठणकर, नितीन पैठणकर, आकाश पैठणकर, अजयपैठणकर, दिलीप पैठणकर, संतोष पैठणकर, शुभमपैठणकर, स्वप्नील पैठणकर आदि समाज बांधव उपस्थित होते

You May Also Like

0 Comments