भोकरदन शहरात शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली

by - 18:38

भोकरदन शहरात शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली


भोकरदन येथील अलहुदा ऊर्दु प्राथमिक, माध्यामिक व उच्च माध्यामिक या शाळे तर्फे पुलवामा येथील दहशतवादी हल्लयात शाहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी एक रैली काढण्यात आली.रैली अलहुदा उर्दु प्राथमिक शाळा व हाजी शेख चांद चौक, काझी मोहल्ला, पोलिस स्टेशन, छत्रपती शिवाजी चौक मार्ग उपविभगीय कार्यालय भोकरदन येथे काढण्यात आली.यात शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

दानापूर :९० टक्के गाव अंधारात

उपविभगीय कार्यालय भोकरदन कार्यालयासमोर गावातील प्रतिष्ठितांनी आपले विचार व्यक्त केले.संस्थेचे अध्यक्ष शब्बीर अहेमद कुरेशी यांनी विचार  मांडतांना असे सांगीतले कि ईस्लाम शांतीचा धर्म आहे.आणि शांतीचा संदेश देतो.ईस्लाम दहशतवादाला विरोध करतो.नंतर रैली उपविभगीय कार्यालय भोकरदन येथे आल्यानंतर तेथे अल फलाह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शब्बीर कुरेशी सचिव गुलाब खान मुख्यध्यापक शेख कामिल पटेल प्राचार्य युनुस खान, नारायण जिवरग,उपनगराध्यक्ष ईरफान सिद्दिकी,नूर सोशल ग्रूपचे अध्यक्ष महेबुब भारती,हाजी मुजीब साहेब,हाफिज़ शफि,मौलवी हारुन,नगरसेवक नसिम पठाण,शे.कदिर,नसीम कुरेशी,केंद्र प्रमुख सोनवणे साहेब,कुदरत सेठ,विष्णु महाराज सासके,बबनराव जंजाळ, डाॅ.सलिम,जमात ईस्लामी अध्यक्ष हाजी अशफाक,युवा व्यापारी मुजिब कुरेशी,ज़हिर सेठ,मुमताज मदनी,अकरम हाजी,फैसल चाउस,शे.रिज़वानोद्दिन,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष काकाराव साहेब,महेमुद भाई, सत्तार सेठ,एजाज खान,राजु सेठ,काझी सलाहोद्दिन ईत्यादी मान्यवर उपस्थित होते. नंतर उपविभगीय अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.यात हल्लेखोरांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.सरकारने यापुढे असे दहशतवादी हल्ले होणार नाही याची काळजी घ्यावी,असे विचार व्यक्त करण्यात आले.

You May Also Like

0 Comments