चौदाशे वर्षांपूर्वी मस्जिद चा उपयोग तंटा मुक्ती केंद्र,रोग निरसन केंद्र ,आर्थिक मदत केंद्र , न्यायालय या सारख्या कामासाठी केला जात होता :प्रा.वाजिद अली खान

by - 08:00

चौदाशे वर्षांपूर्वी मस्जिद चा उपयोग तंटा मुक्ती केंद्र,रोग निरसन केंद्र ,आर्थिक मदत केंद्र , न्यायालय या सारख्या कामासाठी केला जात होता :प्रा.वाजिद अली खान

भोकरदन येथे मस्जिद परिचय कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद


भोकरदन प्रतिनिधी 
शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने मज्जित परिचयाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात कुराणाच्या पठणाने करण्यात आली व त्याचे मराठीत अनुवाद समस्त नागरिकांना सांगण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वाजिद अली खान सर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.यावेळी ते म्हणाले की चौदाशे वर्षांपूर्वी मस्जिद चा उपयोग कोणकोणत्या प्रकारे केले जात होता तर तंटा मुक्ती केंद्र , रोग निरसन केंद्र , आर्थिक मदत केंद्र , न्यायालय केंद्र अशा अनेक भूमिका मस्जिद च्या माध्यमातून होत असत मात्र आज फक्त अल्लाह से प्रार्थना केंद्र म्हणून समजले जाते. मज्जित मध्ये पाच वेळेस अजान व नमाजचे पठण होते. उपस्थित नागरिकांना यावेळी नमाज चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. अनेक हिंदू बांधवांनी हे प्रात्यक्षिक समजून घेतले. जीवन हे क्षणभंगुर असून त्याच्या पलीकडे देखील एक जीवन आहे त्याच्यासाठी तयारी करावयाची आहे मज्जित मध्ये नमाज अदा करतांना कोणीही लहान मोठा उच नीच गरीब-श्रीमंत असा भेदभाव नसतो.तर अगोदर येणाऱ्याला समोरच्या रांगेत स्थान असते. याप्रमाणे प्रार्थना होते , या कार्यक्रमानंतर अनेकांनी आपल्या शंका प्रश्नातून विचारल्या यावर प्रा वाजिद अली खान साहब यांनी समर्पक उत्तर देऊन शंकांचे निरसन केले. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये भोकरदन नगरपरिषदचे मुख्याधिकारी अमित कुमार सोडगे,मराठा संघाचे तालुकाध्यक्ष बबन जंजाळ तसेच रमेश पगारे,बिडवे साहेब,मगरे सर,राठोड सर,मंगेश देशपांडे,सचिन देशपांडे,संजय शास्त्री सर,कुदर सर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल कुद्दुस यांनी केले तर नगरसेवक कादीर बापू यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त मुस्लिम समाज बांधवांनी प्रयत्न केले. शेवटी भोजनाच्या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली.


You May Also Like

0 Comments