बालकांना पोलिओचा डोस पाजुन घ्या :-डॉ.मोतीपावडे |Give polio dose to children: -Dr. Motipawde

by - 21:12

बालकांना पोलिओचा डोस पाजूनघ्या :-डाँ मोतीपावडे



  • भोकरदन दस्तक प्रतिनिधी
भोकरदन शहरामध्ये पल्स पोलिओ मोहिम दिनांक 31 जानेवारी 2021रोज रविवार या दिवशी राबवण्यात येत आहे. यामध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात येणार आहे.खालील ठिकाणी पोलिओ लसीकरण केंद्र ग्रामीण रुग्णालय तर्फे करण्यात आलेले आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे लसीकरण केंद्र चालू राहतील. त्या ठिकाणी जाऊन आपल्या बालकास पोलिओचा डोस पाजून घ्यावा व आपले बालक पोलिओ पासून सुरक्षित करावे असे आव्हान ग्रामीण रुग्णालय भोकरदन चे वैधकिय अधीक्षक डॉ मोतीपावडे यांनी केले आहे,


  • खालील ठिकाणी पोलिओ लसीकरण केंद्र चे आयोजन करण्यात आले आहे


ग्रामीण रुग्णालय (घाटी दवाखाना)भोकरदन. जिल्हा परिषद शाळा नवे भोकरदन .जिल्हा परिषद शाळा धनगरवाडी.समता नगर अंगणवाडी क्रमांक 146.महाडा कॉलनी ,हनुमान मंदिर जवळ.
गजानन महाराज मंदिर.डॉक्टर काळे हॉस्पिटल भोकरदन.केंद्रीय कन्या शाळा , पोस्ट ऑफिस परिसर.अलहूदा प्राथमिक उर्दू शाळा ,उस्मान पेठ.अंगणवाडी क्रमांक 153 ,उस्मान पेठ.सिद्धेश्वर नगर, हनुमान मंदिर.पाठक गल्ली ,अलहुदा उर्दू हायस्कूल. न्यू हायस्कूल , काझी मोहल्ला.श्रीकृष्ण मंगल कार्यालय.खंडोबा मंदिर ,प्रशांत गल्ली.रफिक कॉलनी ,अंगणवाडी क्रमांक 152. बस स्टॅन्ड ,भोकरदन.इत्यादी ठिकाणी करण्यात आले आहे,

You May Also Like

0 Comments