भोकरदन येथे भीषण अपघात १ ठार २ गंभीर |

by - 19:49

भोकरदन येथे भीषण अपघात १ ठार २ गंभीर |
भोकरदन तालुक्यातील देहेड पाटी जवळील घटना 



भोकरदन दस्तक 
31/01/2021 भोकरदन तालुक्यातील देहेडपाटी जवळ दोन दुचाक्यांचा समोरासमोर अपघात झाला आहे यात देहेड येथील बालाजी बावस्कर वय २९ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर तालुक्यातील मानापूर येथील दोन सख्खे भाऊ १) सुधाकर संपत दळवी वय ५० व २) माणिकराव संपत दळवी वय ५५ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या विषयी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार की मयत बालाजी समाधान बावस्कर वय २९ रा.देहेड ता.भोकरदन हा भोकरदन येथील जाफ्राबाद रोडवरील एका पेट्रोल पंपवर काम करीत असून तो कर्तव्य संपल्यावर स्वतःच्या दुचाकी क्र. एम.एच.२१ ए.एल.०३९५ फॅशन प्रो वरून आपल्या मूळ गावी देहेड कडे रवाना झाला होता दरम्यान तालुक्यातीलच मनापूर येथील दोन सख्खे भाऊ देहेड येथे आपल्या पाहुण्यांघरी आपल्या दुचाकी क्र. एम.एच.२१ डब्ल्यू ९१५८ वरून अंत्यसंस्कार साठी आले होते

अंत्यसंस्कार करून परत येत असतांना देहेड पासून एक किमी अंतरावर देहेड सुरांगळी पाटी मधोमध या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली यात बालाजी बावस्कर याला जबर मार लागल्यामुळे तो जागीच ठार झाला होता तर मनापूर येथील सख्खे भाऊ सुधाकर दळवी व माणिकराव दळवी हे ही गंभीर जखमी झाले होते तात्काळ गावांतील नागरिकांनी मयत व जखमींना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या वेळी डॉक्टरांनी गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे रवाना केले होते

You May Also Like

0 Comments