मुख्याधिकारी नियुक्त करण्या ची मांगणी

by - 14:29

मुख्याधिकारी नियुक्त करण्या ची मांगणी

भोकरदन दस्तक न्यूज ब्युरो

भोकरदन नगर परिषदला मुख्य अधिकारी नेमण्यात यावे या मंगणी चे निवेदन माहिती सेवा समिती च्या वतीने नगरविकास राज्य मंत्री मा ना एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे मागणी चे निवेदन सादर करण्यात आले आहे
 सविस्तर वृत्त असे की भोकरदन नगर परिषदेतील मुख्याधिकारी हा पद मुख्य अधिकारी अमित कुमार सोंडगे यांची बदली झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे,ज्यामुळे शहरातील जणते चे काम नप चा मार्फत होत नाही व अतिरिक्त मुख्यधकरी पदी जाफराबाद नगर पंचायत चे मुख्य अधिकारी पूजा दुधनाळे मैडम यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे,परंतु दुधनाळे मैडम भोकरदन नगर परिषदला ना येता जाफराबाद येथूनच नगर परिषद भोकरदन चे काम पाहत असल्याने गोर गरिब जनतेचे महत्वाचे कामे रखडले असून नागरिकांना ना हक्क आर्थिक व मानसिक त्रास होत आहे,नप भोकरदनला कायम स्वरूपी मुख्य अधिकारी नसल्याने वाचक ना राहिलेल्या येथील काम चुकार कर्मचारी फक्त अपडाऊन मध्ये व्यस्त आहे व नप येथे भ्रष्टाचार वाढल्या चे ही तक्रार आहे तसेच निवेदनात म्हटले आहे की जो पर्यंत नप भोकरदन ला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी मिळत नाही तो पर्यंत दुधनाळे मैडम यांना येथे पूर्ण वेळ कार्यालयात बसण्यासाठी आदेशीत करावे, तसेच नप भोकरदन ला तात्काळ मुख्य अधिकारी नेमण्यात यावे व नगर परिषद च्या मांगिल नवीन बांधकाम झालेल्या व्यावसायिक गळ्या चे लिलाव तात्काळ करण्यात यावे अशी मांगणी करण्यात आली आहे, निवेदन सादर करताना माहिती सेवा  समिती तालुका अध्यक्ष जुनेद पठाण,  उपस्थित होते, यावेळी नगरविकास मंत्री मा ना एकनाथरावजी शिंदे यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ मुख्य अधिकारी नियुक्त करण्यात येईल असे त्यांना सांगितले,,

You May Also Like

0 Comments