भोकरदन शहरात घाणीचे साम्राज्य,नगर परिषद झोपेत

by - 19:21

भोकरदन शहरात घाणीचे साम्राज्य




भोकरदन प्रतिनिधी
भोकरदन शहरातील नगर परिषद हद्दीतील काझी मोहल्ला, मार्कज मस्जिद परिसर,सुतार गल्ली,रोकडा हनुमान मंदिर परिसर, मोहम्मदिया मस्जिद परिसर,रफिक कलोनी, पोस्ट आफिस परिसर, बाजार पट्टी नुरानी परिसर, व आदी नगर परिषद च्या दुर्लक्षित भागात घाणी चे साम्राज्य पसरले आहे,



सविस्तर वृत्त असे आहे की मागील अनेक महिन्यापासून वरील प्रभागात नप द्ववरा स्वछता होत नाही,राफिक कलोनी परिसरातील खड्ड्यात दुर्गंध युक्त तुडुंब भरलेल्या नाळ्या चे घाण पाणी साचत असल्याने या भागात एकच दुर्गंधी पसरत असल्याने प्रभागासह संपूर्ण शहरात रोगाई पसरण्याची भीती नागरिकांत निर्माण झालेली आहे,तसेच परिसरात कचऱ्याचे ढीग जागो जागी दिसत आहे ज्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आली आहे,तसाच हाल मोहम्मदिया मस्जिद परिसर,काझी मोहल्ला,कुरेशी नगर,मार्कज नगर मल्ली,सुतार गल्ली पोस्ट आफिस परिसर बाजार पट्टी,रफिक कालोनी,मालन वाडी, आदी भागत झालेली आहे 


या परिसरातील नाळ्या लवकरात लवकर काढण्यात येत नाही ज्यामुळे तुडुंब भरलेल्या नाळ्या चा घाण पाणी रस्त्यावर येत आहे व सदरील परिसरातील नागरिकांना ये जा करणे म्हणजे तारे वर ची कसरत करावी लागत आहे,तसेच संपुर्ण शहरात डासांचा प्रधुर्भव वाढला आहे ज्यामुळं शहरात मलेरिया,कालरा, डेंगु, सह गँभीर आजार पसरू शकतो,शहरात फाबिंग मशीन द्ववरा डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी करण्या ची नितांत गरजेचे आहे,परंतु स्वच्छता अधिकारी या कडे दुर्लक्ष करत आहेत त्यांना या संदर्भात तोंडी लेखी तक्रार सुद्धा शहरातील नागरिकांनी दिली पण त्यांना काही देने घेणे नाही ते फक्त जालना येथून येजा करण्यात मग्न दिसत आहेत,विशेष म्हणजे नगर परिषद कार्यालयला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी नसल्या ने नप कर्मचाऱ्यांनवर कोणताही वाचक नसल्याचे स्पष्ट होत आहेत,शहरात शासना द्ववरा स्वच्छता साठी लाखो रुपये खर्च करून काही ही उपयोग झालेला नाही,असा दिसतय शहरात सर्वत्रच घाणी चे साम्राज्य कायम झाले असून नगर परिषद च्या विरोधात नागरिकांत रोषव्यक्त होत आहेत तसेच प्रभारी नगर परिषद मुख्य अधिकारी दुधनाळे मैडम,यांनी या होणाऱ्या समस्या कडे तात्काळ लक्ष देऊन शहरातील सर्व वार्डात स्वछता मोहीम राबविण्या चे आदेशीत करावे, तसेच शहरातील तुडुंब भरलेल्या नाल्या तात्काळ काढण्यात याव्या व ज्या भागात नाल्या नाही त्या भागात नागरी सुविधा उपलब्ध करून द्यावी व ये जा करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना लगाम लावावी अशी मांग जाणतेतुन होत आहे,

You May Also Like

0 Comments