गोद्री ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आसमाबी रईसखा पठाण तर उपसरपंच जिजाबाई गिन्यानसिंग सुरडकर यांची बिनविरोध निवड

by - 20:18

गोद्री ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आसमाबी रईसखा पठाण तर उपसरपंच जिजाबाई गिन्यानसिंग सुरडकर यांची बिनविरोध निवड



तालुक्यातील गोद्री ग्रा. प. मधील सर्वात तरुण 22 वर्षाची महिला सरपंच


भोकरदन दस्तक प्रतिनिधी 
भोकरदन तालुक्यातील गोद्री येथे दिनांक 12 फेब्रुवारी 2021 वार शुक्रवार रोजी गोद्री ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत सरपंच पदासाठी आसमाबी रईसखा पठाण व उपसरपंच पदासाठी जिजाबाई गिन्यानसिंग सुरडकर यांचे नाम निर्देशन पत्र आल्यामुळे दुपारी दोन वाजता सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत चे सर्व 9 पैकी 6 सदस्य हजर होते आणि 3 सदस्य गैरहजर राहिले या सभेत सरपंच आसमाबी रईसखा पठाण व उपसरपं जिजाबाई गिन्यानसिंग सुरडकर यांचे प्रत्येकी एक-एक अर्ज आल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणतेही अर्ज न आल्यामुळे यांची बिनविरोध निवड केल्याचे अध्यासी अधिकारी श्री. जि. व्ही लहाने यांनी घोषित केले यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शेख अलीम सलीम , अंबादास बजेबा सपकाळ, हरिभाऊ सांडू जोगदंडे, शेंफडाबाई सदाशिव निकाळजे, असमाबी रईसखा पठाण, जिजाबाई गिन्यानसिंग सुरडकर हे पूर्ण सदस्य निवडणूक प्रक्रियेत हजर होते सदरील ग्रामपंचायत ही मागील पाच वर्षांपूर्वी भाजपच्या ताब्यात होती यावेळी मात्र ग्रामपंचायतचे 9 पैकी 6 सदस्य हिंदू-मुस्लिम एकता ग्रामविकास पॅनल मधून निवडून आले आहे यावेळी निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून श्री.जि. व्ही लहाने यांनी काम पाहिले तसेच तलाठी श्री बि. डी. जाधव ग्रामसेवक श्री. व्ही. एम.देशपांडे तसेच पोलीस प्रशासन तर्फे पोलीस अंमलदार समाधान जगताप यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

You May Also Like

0 Comments