जमीन सुपिकता निर्देशांक मोहीम ठरेल शेतीला वरदान

by - 11:14

जमीन सुपिकता निर्देशांक मोहीम ठरेल शेतीला वरदान


भोकरदन दस्तक प्रतिनिधी
भोकरदन तालुक्यातील आनवा मंडळातील गोद्री ग्राम पंचायतवर शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल ,असे गावाच्या शिवारातील जमिनीमध्ये उपलब्ध सुक्ष्म अन्नद्रव्ये व इतर घटकांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणारे खत पिकनिहाय किती प्रमाणात द्यायचे , याबाबत सविस्तर मार्गदर्शक ठरणारे जमिन सुपिकता निर्देशांक फलक लावन्यात आले .भोकरदन तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात हे फलक लावण्याची मोहिम कृषि विभागामार्फत आयोजित केली होती .त्यानुसार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा.बाळासाहेब शिंदे , तालुका कृषी अधिकारी भुते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरदन तालुक्यात एकाच दिवशी सर्व ग्रामपंचायत मध्ये जमीन सुपीकता निर्देशांक लावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले .तसेच पारंपरिक पीके व एकच पीक न घेता पीक रचनेत बदल करून वेगवेगळी पिके घ्यावीत तसेच निव्वळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय जसे दुग्धव्यवसाय , कुकुटपालन ,शेळीपालन इत्यादी करून दिवसाला किमान 500 रुपये मिळतील असे किंवा कमीत कमी घर खर्च भागेल असे करावे.त्यातून मिळणाऱ्या खतांचा वापर करून शेतीची सुपिकता वाढेल परिणामी रासायनिक खतांचा वापर कमी होईल सोबतच कीटकनाशक औषधींचा खर्चही कमी होईल.यावेळी मूल्यसाखळी म्हणजेच उपलब्ध पाणीसाठा ,पिकावर होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा अभ्यास करून पिकाची निवड करावी इत्यादी विषयी कृषी सहायक एस.एल.सिनकर यांनी मार्गदर्शन केले .
यावेळी  सुदाम पा.देठे (पंचायत समिती सदस्य भोकरदन),जावेदखा पठाण (संस्थापक अध्यक्ष - आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोद्री), श्रीधर सुरडकर, कोमल सुरडकर, सतीश जगताप व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.





गोद्री ग्रामपंचायत येथे कृषी सहायक एस.एल.सिनकर यांनी फलक लावून  मार्गदर्शन केले .यावेळी  सुदाम पा.देठे (पंचायत समिती सदस्य भोकरदन),जावेदखा पठाण (संस्थापक अध्यक्ष - आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोद्री), श्रीधर सुरडकर, कोमल सुरडकर, सतीश जगताप व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

You May Also Like

0 Comments