विना मास्क फिरणार्‍यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात

by - 21:21

विना मास्क फिरणार्‍यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात

#54 लोकांवर नगर परिषद च्यावतीने कारवाई करण्यात आली दहा हजार आठशे रुपये दंड वसुल करण्यात आला

प्रतिनिधी| महेबूब भारती

जालना जिल्हयासह भोकरदन तालुक्यात ही करोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. करोना धोका वाढत असतानाही काही व्यक्तींकडून नियमांचे पालन केले जात नाही.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, घराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क लावा. अशा सूचना प्रशासनाकडून वारंवार दिल्या जात आहेत. तरीही लोक या सुचनांचे पालन करताना दिसत नाही. यामुळे भोकरदन नगर परिषद व शहर पोलिसांकडून यांच्या संयुक्त पथकाकडून सुरूवातीपासून दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत.आज शहरात कारवायांची ही मोहीमेला सुरुवात सोमवारी सकाळी 7 ते 2 वाजे च्या दरम्यान करण्यात आली ही मोहीम  अधिक गतिमान करण्यात येणार असे प्रशासन कडून सांगण्यात आले आहे,

शहरातील रस्त्यावर मास्क न लावणार्‍या वाहनचालकांवर भोकरदन नगर परिषद व पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. तोंडाला मास्क नसल्यास प्रत्येकी 200 रुपये दंड नगर परिषदने लावला असून विना मास्क फिरणाऱ्या54 लोकांनवर नप ने  कार्यवाही करून 10 हजारा आठ शे रुपयेचा दंड वसूल करण्यात आला आहे

जर, एखाद्या व्यक्तीने दंड भरण्यास नकार दिला तर त्याच्याविरुद्ध भादंवि 188 नुसार गुन्हा दाखल केला जात आहे राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध बाबींना जिल्ह्यात परवानगी दिली आहे.

मात्र, त्याचबरोबर करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यामुळेच नगर परिषद क्षेत्र आणि प्रत्येक तालुक्यात अधिकाधिक चाचण्या घेऊन रुग्णांपर्यंत पोहोचावे आणि संसर्गाची साखळी तुटावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासंदर्भातील निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवड यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

त्याचबरोबर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, घराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क अवश्य लावा. आजाराची लक्षणे आढळताच तात्काळ जवळच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये जाऊन तपासणी करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.

करोना चाचण्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  विविध बाबींना जिल्ह्यात परवानगी दिली आहे. परवानगी दिली असली तरी कोव्हिड प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासन वेळोवेळी देत आहे.

परंतु, नागरिक नियम पाळत नसल्याने मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. करोना रुग्णांचे प्रमाण भोकरदन तालुक्यात मोठेआहे. शहरातील मेन चौकात, बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे सामूहिक संसर्गाचा धोका वाढला आहे. यामुळे नगर परिषद व शहर पोलिसांनी मास्कचा वापर न करणार्‍यांवर ही कारवाई अधिक गतिमान केली आहे.यावेळी नगर परिषद व पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते
  
मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे अशा व्यक्तीविरूद्ध दंडात्मक कारवाई सुरूवातीपासून सुरू आहे. यासाठी नगर परिषद पथके काम करत आहे. शहर पोलिसांची मदत घेतली जात आहे. ज्या ठिकाणी गर्दी होत आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौकात ही कारवाई केली जात आहे. एखाद्या व्यक्तीवर कारवाई केली. पुन्हा तोच व्यक्ती मास्क न लावलेल्या अवस्थेत आढळून आला तर त्याची दंडाची रक्कम वाढविण्यात येणार. वारंवार एखाद्या व्यक्तीकडून मास्क लावले गेले नाही तर त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला जाईल.

(अविनाश कोरडे )उपविभागीय अधिकारी भोकरदन

You May Also Like

0 Comments