विज पडून वडलाच्या डोळ्यासमोर एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यु,तालूक्यातील तड़ेगांव वाड़ी येथील घटना,
विज पडून वडलाच्या डोळ्यासमोर एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यु,तालूक्यातील तड़ेगांव वाड़ी येथील घटना,
भोकरदन प्रतिनिधी
भोकरदन:गुरूवार रोजी तालूक्यात वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस पडल्याने वडीलांच्या समोर विज पडून एकुलता एक मुलाचा दुर्दैवी मृत्य झाल्याची घटना तालुक्यातील तडेगांव वाडी येथे घडली आहे आली आहे,राहूल रायसिंग सुंदरडे वय 29.वर्ष रा.तडेगांव वाडी असे मयताचे नाव आहे.या संदर्भात अधिक माहीती अशी की तालुक्यातील तडेगांव वाडी येथील गट क्रमांक 141.स्वताचे शेतात वडील रामसिंग सुंदरडे व राहूल सुंदरडे, गुरूवारी दुपारी 3:30.ते 4.वाजेच्या सुमारास अचानक वातावरण बदलल्याने पाऊस सुरू झाला होता त्यामुळे दोन्ही बापलेक शेतातील मकाचे गंज झाकण्यासाठी गेले होते त्यावेळी चार वाजेच्या सुमारास राहूलच्या अंगावर विज कोसळुन त्याचा जागीच मृत्यझाला सदरील दुर्दैवी घटना वडीलांच्या डोळ्यासमोर काही अंतरावर घडली कारण दोघांचा अंतर जास्त नव्हता जवळील शेतकऱ्यांनी राहूल सुंदरडे याला भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तपासून डाॅक्टरांनी मृत्य घोषित केले नंतर शवविच्छेदन करून रात्री तडेगांव वाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले याचे पच्छताप पत्नी, एक मुलगा,आई,वडील, दोन बहीणी आहे घटनेची नोंद भोकरदन पोलीसांकडून करण्यात आली या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


0 Comments