नुकसानग्रस्त भागाची आ संतोष दानवे यांच्याकडून पाहणी,तात्काळ पंचनामे करण्या चे दिले आदेश
नुकसानग्रस्त भागाची आ संतोष दानवे यांच्याकडून पाहणी,तात्काळ पंचनामे करण्या चे दिले आदेश
प्रतिनिधी भोकरदन:
भोकरदन : भोकरदन शहरसह संपूर्ण तालुक्यात गुरुवारी ( दि. 18 ) दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीचा पाऊस झाला. अचानक झालेल्या गारपीटीमुळे शहरासह, ग्रामीण भागात व शेतात सर्वत्र गारांचा खच साचले होते. यामुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा सिड्स, हरबरा, या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीट झालेल्या क्षेत्राची पाहणी आज रोजी 19 फेब्रुवारी मा आमदार संतोष दानवे यांनी पाहणी केली सविस्तर वृत्त असे कीभोकरदन शहरासह तालुक्यातल्या मुठाड, इब्राहीपूर, तांदुळवाडी, नांजा, क्षीरसागर, मासनपूर, जोमाळा, मालखेडा, सुभानपूर या भागात वादळी वारा आणि गारपीट झाली. या गारपीटीमुळे गहू, हरभरा, कांदा बियाणे या पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.काढणीला आलेले पिकाचे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आज शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांनी प्रत्यक्ष बांदावर जाऊन पाहनी करून, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्यास आदेशित केले. यावेळी परिसरातील त्रस्त शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते,संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. झालेल्या पिकाची नुकसानभरपाई त्वरीत मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे


0 Comments