देशी दारू दुकानाचे स्थानतर करा; नगर परिषद भोकरदन चे आदेश,
देशी दारू दुकानाचे स्थानतर करा; नगर परिषद भोकरदन चे आदेश,
#अन्यतः दुकान सिल करण्यात येईल नप चा इशारा
भोकरदन दस्तक प्रतिनिधी
भोकरदन नगर परिषद कार्यालयात दि23 मंगळवारी रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते नप ने अनेक विषयांवर चर्चा केली होती परंतु शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारची असलेली देशी दारूची दुकानाचा इतर ठिकाणी स्थानतरण चा मुद्दा उपनगराध्यक्ष इरफान सिद्दिकी, व नगरसेवक दीपक बोर्डे यांनी उचलून धरला यामुळे सर्वसाधारण सभेत एकच गोंधळ झाला होता,
सविस्तर वृत्त असे की नप हद्दीतील देशी दारूची दुकान ही नप ची जागा मालमत्ता क्रा ७ मध्ये सध्या सुरू असून या ठिकाणी महापुरुषचा स्मारक व धार्मिक स्थळ असल्याने शहरातील नागरिकांनी याबाबत अनेक वेळा नगर परिषद ला तक्रारी सुद्धा दाखल केली आहे,तसेच नप सदस्यनी सुध्दा याबत तक्रार केली होती या विषयावर नप चे उपाध्यक्ष इरफान सिद्दिकी व नगर सेवक दीपक बोर्डे यांनी चांगलेच गोंधळ केले व देशी दारू दुकान इतर ठिकाणी हलविण्यात यावी अशी मांगणी चा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर केला आहे,ज्याचा ठराव क्रा असा आहे ११(७)दिनांक ७अक्टोबर२०२० अन्वेय ठराव पेरेरीत केला आहे,
यापूर्वी आपणास जा क्रा २०/नप भोकरदन/जामा/कवी१३८८दिनांक४दिसेम्बर रोजी पत्र देऊन दुकान इतर ठिकाणी हलविण्यात यावे असे कळविले, असता आतापर्यंत देशी दारू दुकान हलविण्यात आले नाही त्यामुळे दिनांक२३ फेब्रुवारी२०२१ रोजी पुन्हा सभागृहात सदरील प्रशन उपस्थित करण्यात आला असून हे पत्र मिळाल्याच्या तिन दिवस च्या आत आपण देशी दारू ची दुकान इतर ठिकाणी हलविले नाही तर आपणा विरोधात महाराष्ट्र नगर परिषद पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम१९६५ कायद्याच्या नुसार नगर परिषदच्या वतीने सदरील दुकानावर कार्यवाही करून सिल करण्याचा नप द्ववरा इशारा देण्यात आला आहे,
0 Comments