भोकरदन :अफूच्या शेतात पोलिसांचा छापा; अकरालाखांचे झाडे व चार आरोपी ताब्यात

by - 20:36

अफूच्या शेतात पोलिसांचा छापा; अकरालाखांचे झाडे व चार आरोपी ताब्यात

भोकरदन दस्तक प्रतिनिधी  
पोलीस ठाणे जाफ्राबाद हद्दीतील गोपी शिवारात उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे जाफराबाद यांची संयुक्त कारवाई 11 लाख किंमतीची अफूची झाडे व 4 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे।ही कारवाई दिनांक १.३.२०२१ सोमवारी रोजी पोलीस ठाणे जाफ्राबाद हद्दीत मौजे गोपी शिवारात एका कांद्या चे पिकाचे शेतात अफू च्या झाडाची तस्करी करण्याचे उद्देशाने लागवड करून संगोपन केले आहे अशी माहाती पोलीसांना सूत्रांन कडून मिळाली होती. त्या अनुषंगाने ताबडतोब सदर कार्यवाही साठी लागणारे सर्व नियम पाळून स्वतः पोलिस उपविभागीय अधिकारी श्री इंदल बहुरे व सपोनि श्री मोरे पोलीस ठाणे जाफ्राबाद यांनी पथक तयार करून कृषी विभाग, शासकीय पंच, महसूल विभाग चे अधिकारी यांचे सह गोपी शिवारात छापा मारला असता तेथील एका कांद्याची शेतात 40 किलो अफू ची झाडे लागवड केलेली दिसली त्यावरून सर्व अफू ची झाडे ताब्यात घेऊन रीतसर पंचनामा करून 11लाख रु किमतीचे सर्व झाडे जप्त करण्यात आली आहे. सदर कार्यवाही ही मा पोलीस अधीक्षक श्री विनायक देशमूख व मा अपर पोलीस अधिक्षक श्री विक्रांत देशमुख यांचे मार्गदर्शन खाली स्वतः Dysp श्री इंदलसिंग बहुरे,सपोनि श्री अभिजित मोरे पो उप नि श्री नितीन काकर वाल सहाय्यक फौजदार आसेफ शेख.पोना राजु डोईफोडे, पोना सुभाष जायभाये,पोना रामेश्वर सिनकर, पोना नरहरी खार्डे,पोलीस अंमलदार सचिन तिडके, गणेश पायघन, योगेश पाटील पाईक,शाबान तडवी, निलेश फुसे चालक लक्ष्मन वाघ,कृषी विभाग चे विजय गायकवाड, यांनी केली आहे.



You May Also Like

0 Comments